AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punit Talreja | ‘खिचडी’ फेम पुनीत तलरेजावर ठाण्यात प्राणघातक हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अंबरनाथ बस्ती येथे घडलेल्या या घटनेत पुनीत हा आईसाठी औषधे खरेदी करून परतत होता. त्यानंतर अचानक दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा मार्ग अडवला. सुरुवातीला त्यांनी पुनीतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर वादाने वाढला आणि हल्लेखोरांनी पुनीतवर हल्ला केला.

Punit Talreja | 'खिचडी' फेम पुनीत तलरेजावर ठाण्यात प्राणघातक हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 3:28 PM
Share

मुंबई : टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध स्टार पुनीत तलरेजाच्या (Punit Talreja) बाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यात रविवारी रात्री दोन जणांनी पुनीतवर प्राणघातक हल्ला केलायं. मंगळवारी ठाणे पोलिसांकडून ही माहिती मिळालीयं. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पुनीत औषधे खरेदी करून घरी परतत असताना ही घटना घडलीयं. हल्ल्याची घटना अंबरनाथ वस्ती येथील आहे. पुनीतने खिचडी या प्रसिद्ध मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हल्ल्यानंतर पुनीतला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावरती सध्या उपचार (Treatment) सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

पुनीतला शिवीगाळ करत केला प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अंबरनाथ वस्ती येथे घडलेल्या या घटनेत पुनीत हा आईसाठी औषधे खरेदी करून परतत होता. त्यानंतर अचानक दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा मार्ग अडवला. सुरुवातीला त्यांनी पुनीतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर वाद वाढला आणि हल्लेखोरांनी पुनीतवर हल्ला केला. पुनीतचे वय अवघे 34 वर्षे आहे. हल्लेखोरांनी पुनीतवर लोखंडी रॉड आणि त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्रांनी वार केले. या हल्लात पुनीत गंभीर जखमी झालायं.

पोलिसांनी केला तपास सुरू…

अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलायं. यासर्व प्रकरणावर बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत पुनीत तलरेजा गंभीर जखमी झाला आहे. तेथून जाणाऱ्या काही प्रवाशांनी अभिनेत्याला रुग्णालयात नेले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळाली नसून तपास सुरू केलायं.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल