The Kashmir Files | अखेर त्या वादग्रस्त विधानावर नदाव लॅपिड याने मागितली माफी…

| Updated on: Nov 30, 2022 | 9:07 PM

यावर लोक संताप व्यक्त करून नदाव लॅपिडचा निषेधही करत होते. अनुपम खेर यांनीही नदाव लॅपिडच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला होता

The Kashmir Files | अखेर त्या वादग्रस्त विधानावर नदाव लॅपिड याने मागितली माफी...
Follow us on

मुंबई : नदाव लॅपिडने द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नदाव याने हे विधान केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावर लोक संताप व्यक्त करून नदाव लॅपिडचा निषेधही करत आहेत. अनुपम खेर यांनीही नदाव लॅपिडच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. चित्रपटाचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी तर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नदाव लॅपिडला खुले आव्हानच देऊन टाकले होते.

नदाव लॅपिडच्या विधानाचा बाॅलिवूडमधील अनेकांनी विरोध केला. इतकेच नव्हेतर विवेक अग्निहोत्री यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, नदाव लॅपिडने भारतामध्ये येऊ हे विधान केले हे अत्यंत धक्कादायक आहे.

नदाव लॅपिड याने द काश्मीर फाईल्स हा एक वल्गर आणि अपप्रचार करणारा चित्रपट असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, तू फक्त मला याचे पुरावे आणून दे, मी चित्रपट तयार करणेच बंद करतो.

हे प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच आता नदाव लॅपिडने याप्रकरणात माफी मागितली आहे. नदाव म्हणाला आहे की, मी माझे वक्तव्य काश्मीरच्या लोकांसाठी नाही तर फक्त चित्रपटासाठी केले होते. माझ्या वक्तव्यामुळे लोक दुखावले गेले असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो…

नदाव लॅपिडच्या द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या त्या विधानानंतर संपाताची लाट निर्माण झाली होती. विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले होती की, काश्मीर फाइल्स या चित्रपटातील एकही गोष्ट चुकीची दाखवण्यात आली नाहीये.

इतकेच नाही तर चित्रपट तयार करण्याच्या अगोदर मी 700 लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांच्याशी चर्चा केली आहे. ज्या 700 लोकांशी मी चर्चा केली, त्यांच्या आई-वडील, बहीण, भाऊ यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते.