AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Pataker : पोस्ट रंगवले… उपाशी राहिले, कधी काळी कमावयचे फक्त 35 रुपये; नाना पाटेकर शेवटपर्यंत विसरले नाहीत ते दिवस…

नाना पाटेकर यांचा ३५ रुपयांवरून सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. रस्त्यावर पोस्टर रंगवण्यापासून ते झेब्रा क्रॉसिंगचे काम करण्यापर्यंत अनेक कष्ट त्यांनी सोसले. गरिबी विसरले नाहीत, म्हणूनच यशानंतरही साधेपणा जपला आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास अनेकांना आदर्श ठरतो.

Nana Pataker : पोस्ट रंगवले... उपाशी राहिले, कधी काळी कमावयचे फक्त 35 रुपये; नाना पाटेकर शेवटपर्यंत विसरले नाहीत ते दिवस...
nana patekar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 10:13 AM
Share

कधी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग करण्याचं काम केलं… कधी पोस्टर रंगवले… रस्त्यावर पोस्टर लावले… कधी कधी तर उपाशी राहावं लागलं… तरीही नाना पाटेकर यांनी आयुष्यात हार मानली नाही. कठोर परिश्रम करत राहिले आणि त्यांनी स्वत:चं साम्राज्य उभं केलं. ज्या मुंबईच्या हमरस्त्यावर सिनेमाचे पोस्टर लावले, त्याच रस्त्यावर स्वत:च्या सिनेमाचे पोस्टर पाहून नाना हरखून जायचे. त्यांचा उर भरून यायचा. अनेकदा नाना हा किस्सा सांगायचे. शेवटपर्यंत ते गरीबी विसरले नव्हते. म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायचे. बळीराजांच्या विधवांना सढळ हस्ते मदत करायचे. साधे राहायचे. त्यामुळेच नाना बॉलिवूडच्या दुनियेतही जगावेगळे आणि आपले वाटायचे…

नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. एक दमदार अभिनेता, सामाजिक जाणीव असलेला माणूस म्हणून नाना पाटेकर यांची ओळख आहे. नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिकांपासून चरित्र भूमिकाही केल्या. व्हिलनपासून कॉमेडी रोलपर्यंत सर्व भूमिकांमध्ये नाना पाटेकर लिलया वावरायचे. त्यांचा सिनेमा आला आणि त्यांच्या अभिनयाची चर्चा झाली नाही, असं कधी झालं नाही. इतका मोठा हा अभिनेता होता.

अमिताभही गहिवरले

नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरूड जंजिरा येथे झाला. नानाचं कुटुंब सुरुवातीच्या काळात सधन होतं. पण नाना 13 वर्षाचे असतील तेव्हा त्यांच्या वडिलांची फसवणूक झाली. त्यांचा बिजनेस हडप केला गेला. त्यामुळे पाटेकर कुटुंबावर हालाखीचं जीवन जगण्याची वेळ आली. कमी वयातच नानांवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यावेळी जगण्यासाठी त्यांना दगडखाणीत काम करावं लागलं. शाळा सोडून चुनाभट्टीत सिनेमाचे पोस्टर्स लावण्याचं काम करायचे. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचं काम करायचे. त्याचे 35 रुपये मिळायचे. त्यातूनच मग दिवस ढकलला जायचा. नाना पाटेकर एकदा केबीसीमध्ये आले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांनी हा किस्सा सांगितला. तेव्हा अमिताभ यांनाही गहिवरून आलं होतं.

म्हणून साधी राहणी

नाना पाटेकर यांनी अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले होते. शिक्षण करण्याची घरची परिस्थिती नसल्याने नानाला मावशीकडे मुरूडला जावं लागलं होतं. पण तिथूनही यावं लागलं. त्यानंतर चुनाभट्टीत त्यांनी मिळेल ते काम केलं. जेव्हा नाना स्टार झाले. नाव लौकीक झाला. पैसा मिळाला. तेव्हाही नाना जमिनीवरच राहिले. त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवली. म्हणूनच ते अत्यंत साधे राहायचे. मिळेल ते खायचे. कधी त्यांनी कुणाला दुखावले नाही. नेहमी लोकांच्या मदतीला धावून जायचे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार