AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाळ्यावर मोठी टिकली, लाल साडी आणि लिपस्टिक पाहा कोण आहे हा अभिनेता…

विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीला पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.

कपाळ्यावर मोठी टिकली, लाल साडी आणि लिपस्टिक पाहा कोण आहे हा अभिनेता...
| Updated on: Dec 17, 2022 | 10:12 PM
Share

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हड्डी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याचा या चित्रपटामधील पहिला लूक व्हायरल झाला होता. तेंव्हापासून या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. दरवेळी हटके भूमिका करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी हा यावेळी हड्डी या चित्रपटामध्ये थेट एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. याच चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी याचा अजून एक लूक सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीला पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याने हड्डी चित्रपटामधील त्याचा हा लूक चाहत्यांसाठी शेअर केलाय. या फोटोमध्ये नवाजुद्दीन याने लाल रंगाची साडी घातलीये. तर कपाळ्यावर टिकली देखील लावली आहे.

कानामध्ये मोठे झुमके आणि गळ्यामध्ये मोठा हार देखील घातलेला दिसतोय. ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावलीये. सुरूवातीला हे ओळखूच येत नाहीये की, हा नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक देखील दिसत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याला हा मेकअप करण्यासाठी तब्बल तीन तास लागल्याचे सांगितले जात आहे. या लूकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने हेवी मेकअप केल्याचे दिसत आहे. हड्डी हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

हा लूक शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकी याने सुंदर एक कॅप्शन देखील लिहिले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने 80 ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम केले आहे. यावर बोलताना काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता की, खरोखरच ही भूमिका करण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानतो.

हा चित्रपट करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे आणि यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सुवर्णसंधीच मिळाली. हड्डी चित्रपटामधून मला बऱ्याच गोष्टी या शिकायला भेटल्याचे देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले होते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा