AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पल घालून नयनतारा तिरूपती मंदिरात, लिगल नोटिस, माफीनामा, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर…

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नयनतारा आणि विग्नेश शिवन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेले. या मंदिरात अनवाणी जाण्याची प्रथा आहे. पण या नियमाला धाब्यावर बसवत नयतारा चप्पल घालून मंदिर फिरली. त्यानंतर या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

चप्पल घालून नयनतारा तिरूपती मंदिरात, लिगल नोटिस, माफीनामा, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर...
| Updated on: Jun 12, 2022 | 6:56 PM
Share

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) नुकतीच विवाहबंधनात अडकली. दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) आणि नयनतारा यांनी चेन्नईतल्या महाबलीपुरम इथं कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. गेल्या सात वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नयनतारा आणि विग्नेश शिवन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेले. या मंदिरात अनवाणी जाण्याची प्रथा आहे. पण या नियमाला धाब्यावर बसवत नयतारा चप्पल घालून मंदिर फिरली. त्यानंतर या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. शिवाय या सगळ्यानंतर तिला कायदेशीर बजावण्यात आली आहे.

नयनतारा चप्पल घालून तिरूपतीला

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नयनतारा आणि विग्नेश शिवन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेले. या मंदिरात अनवाणी जाण्याची प्रथा आहे. पण या नियमाला धाब्यावर बसवत नयतारा चप्पल घालून मंदिर फिरली. त्यानंतर या दोघांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. शिवाय या सगळ्यानंतर तिला कायदेशीर बजावण्यात आली आहे.

नयनताराचा माफीनामा

नयनताराला मंदिरा व्यवस्थापनाकडून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली त्यानंतर नयनतारा आणि विग्नेश यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी मंदिर प्रशासनालाही देण्यात आली आहे. “लग्नानंतर आम्ही आमच्या घरी न जाता थेट तिरुपती मंदिरात गेलो. मंदिरातून पुष्कळ लोक बाहेर आले आणि त्यांनी आमच्याभोवती गराडा घातला. आम्ही लगोलग आमचं फोटोशूट केलं. गडबडीत मंदिराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या गोंधळात जिथे चप्पल घालण्यास बंदी आहे, त्याठिकाणी चप्पल घालून गेलो. पण ते अनावधानाने झालं. त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत”, असं नयनतारा आणि विग्नेश यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

मार्च 2021 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला. हे दोघं 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. नयनताराने 2003 मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नयनताराचं नाव आवर्जून घेतलं जातं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.