Neha Kakkar, Rohanpreet Singh: नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगच्या सामानाची चोरी; हिऱ्याच्या अंगठीसह मौल्यवान वस्तू लंपास

Neha Kakkar, Rohanpreet Singh: नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगच्या सामानाची चोरी; हिऱ्याच्या अंगठीसह मौल्यवान वस्तू लंपास
Neha Kakkar, Rohanpreet Singh
Image Credit source: Facebook

रोहनप्रीतच्या (Rohanpreet Singh) हॉटेलच्या खोलीतून गायब झालेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये हिऱ्याची अंगठी, आयफोन आणि अॅपल घड्याळाचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 1:25 PM

गायिका नेहा कक्करचा (Neha Kakkar) पती आणि गायक रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) याच्या काही वैयक्तिक वस्तूंची चोरी झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi) इथल्या एका हॉटेलमध्ये हा दरोडा पडला. या हॉटेलमध्ये रोहनप्रीत व्हेकेशनसाठी थांबला होता. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रोहनप्रीतच्या हॉटेलच्या खोलीतून गायब झालेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये हिऱ्याची अंगठी, आयफोन आणि अॅपल घड्याळाचा समावेश आहे. शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडीचे पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं, “मंडीतील एका हॉटेलमधून रोख रक्कम, आयफोन, स्मार्टवॉच आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगची हिऱ्याची अंगठी यासह काही वैयक्तिक सामान चोरीला गेलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. रोहनप्रीत सिंग हा गायिका नेहा कक्करचा पती आहे.”

पहा फोटो-

नेहा आणि रोहनप्रीत यांनी डिसेंबर 2020 मध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. नेहा आणि रोहन यांची एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नेहाचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे. ती भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी पहिली गायिका आहे. इतकंच नव्हे तर नेहाने काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनाही मागे टाकले होतं. इंस्टाग्रामवर नेहाचे 60 दशलक्ष फॉलोअर्स झाले होते.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें