Nimrat Kaur: ‘दसवी’साठी निम्रतने वाढवलं 15 किलो वजन; विनाकारण सल्ला देणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

भूमिकेच्या गरजेनुसार कलाकाराला अनेकदा त्याच्या शरीरयष्टीत बदल करावे लागतात. कधी झिरो साइज फिगर करावी लागते तर कधी आहे त्यापेक्षा अधिक वजन वाढवावं लागतं. कोणत्याही कलाकारासाठी हा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा नसतो.

Nimrat Kaur: 'दसवी'साठी निम्रतने वाढवलं 15 किलो वजन; विनाकारण सल्ला देणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Nimrat Kaur Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 1:47 PM

भूमिकेच्या गरजेनुसार कलाकाराला अनेकदा त्याच्या शरीरयष्टीत बदल करावे लागतात. कधी झिरो साइज फिगर करावी लागते तर कधी आहे त्यापेक्षा अधिक वजन वाढवावं लागतं. कोणत्याही कलाकारासाठी हा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा नसतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दसवी’ (Dasvi) या चित्रपटासाठी अभिनेत्री निम्रत कौरने (Nimrat Kaur) तब्बल 15 किलो वजन वाढवलं. हा दहा महिन्यांचा तिचा प्रवास कसा होता, वजन वाढवताना तिला लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना कसं सामोरं जावं लागलं याविषयी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने अनेकांना सडेतोड उत्तरसुद्धा दिलं आहे. त्याचसोबत तिने ट्रान्सफॉर्मेशनचे (physical transformation) फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. ‘दसवी’ या चित्रपटात निम्रतने बिमला देवी ही भूमिका साकारली. यामध्ये तिच्यासोबत अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

‘तुमचं वय, व्यवसाय आणि लिंग कोणतंही असो, जिथे तुम्ही कसं दिसलं पाहिजे याविषयी लोकांच्या अपेक्षा अधिक असतात तिथे मी माझ्या आयुष्यातील एका छोट्या प्रवासाविषयी सांगू इच्छिते. या प्रवासात मला आयुष्यभरासाठीची शिकवण मिळाली. टिपिकल मिडियम बॉडी टाइप असलेल्या मला ‘दसवी’साठी वजन वाढवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यासाठी मी जवळपास 15 किलो वजन वाढवलं. अनेकांनी माझ्यावर टिप्पणी केली, विनोद केला, मी काय खावं यासाठी न विचारता सल्ले दिले गेले. या संपूर्ण प्रवासात एक मुलगी आणि अभिनेत्री म्हणून मला ही गोष्ट समजली की इतरांच्या आयुष्यात डोकावू नका हे सांगून उपयोगाचं नाही. हा माझा संपूर्ण प्रवास पूर्ण झाला असून मी पुन्हा वजन कमी केलं आहे. इतरांनी केलेल्या टिप्पणीवरून, कमेंट्सवरून मी माझं माझ्यासोबतचं नातं इतरांच्या दृष्टीकोनातून ठरवू नये हे मला नीट समजलं,’ अशा शब्दांत ती व्यक्त झाली. या पोस्टच्या अखेरीस तिने सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. ‘इतरांशी प्रेमळपणाने, दयाळूपणाने वागा, संवेदनशील व्हा. जर तुम्ही चांगलं करू शकत नसाल तर एखाद्याचा दिवस तरी खराब करू नका. जबाबदारपणे वागा. तुमच्या मनावर आणि शरीरावर फक्त स्वत:चा ताबा ठेवा, इतर कोणाचाही नाही”, असं तिने लिहिलं.

निम्रतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. ‘दसवी’ या चित्रपटातील निम्रतच्या भूमिकेला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री असलेला पती जेव्हा तुरुंगात जातो तेव्हा बिमला देवीला अचानक मुख्यमंत्रीपदावर नियुक्त व्हावं लागतं. शिक्षणाचं महत्त्व सांगणारा हा चित्रपट 7 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा:

KGF 2: ‘बाहुबली’ला शरद केळकर, ‘पुष्पा’ला श्रेयस तळपदे.. पण KGF 2च्या ‘रॉकी’ला कोणा दिला दमदार हिंदी आवाज?

VIDEO: गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप, “तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार..”

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.