AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तिने स्वतःच भिंतीवर डोकं आपटलं आणि माझ्यावर…’, करण मेहराने सांगितलं त्या दिवशी काय नेमकं घडलं?

निशाने करणविरोधात प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र, या प्रकरणात करणला जामीन मिळाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर करणने आपले स्पष्टीकरण दिले आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडले, ते त्याने सांगितले आहे.

‘तिने स्वतःच भिंतीवर डोकं आपटलं आणि माझ्यावर...’, करण मेहराने सांगितलं त्या दिवशी काय नेमकं घडलं?
करण आणि निशा मेहरा
| Updated on: Jun 01, 2021 | 6:45 PM
Share

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम छोट्या पडद्यावरचा सुप्रसिद्ध अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली होती. घरगुती वाद प्रकरणात अभिनेत्याला मंगळवारी गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. करण मेहरा आणि त्यांची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात वाद सुरु असल्याची चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु होती आणि आता हा वाद बराच वाढला आहे (Nisha Rawal Assault Case Actor Karan Mehra gives clarification on allegations).

त्यानंतर निशाने करणविरोधात प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र, या प्रकरणात करणला जामीन मिळाला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर करणने आपले स्पष्टीकरण दिले आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडले, ते त्याने सांगितले आहे.

निशाने पोटगीची मागणी केली

खरं तर, निशाचा असा आरोप असा आहे की, मौखिक भांडणाच्या वेळी करणने आपल्यावर हात उगारला. याबाबत करणकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्याने सांगितले की, रात्री दहाच्या सुमारास या जोडप्यामध्ये घटस्फोटाबाबत चर्चा सुरू होती. त्या दरम्यान निशाने करणकडे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागितली. मात्र, करण याने आपल्याकडे इतके पैसे नाहीत, मी पैसे देऊ शकत नाही, असे सांगत नकार दिला.

त्यानंतर तेथे उपस्थित निशाच्या भावाने त्या दोघांना सांगितले की, हा विषय कायदेशीररित्या निकालात काढावा. यानंतर करण व निशा यावर एकमत झाले आणि आपापल्या बेडरूममध्ये गेले. करणने पोलिसांना सांगितले की, यानंतर तो आपल्या आईशी फोनवर बोलत होता आणि त्या दरम्यान निशाने त्याच्या रूममध्ये येऊन त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर निशा त्याच्यावर थुंकली. तिने त्याच्या कुटुंबास शिवीगाळ केली (Nisha Rawal Assault Case Actor Karan Mehra gives clarification on allegations).

निशाने स्वतःच भिंतीवर डोकं आपटलं!

करणच्या म्हणण्यानुसार, शिवीगाळ केल्यानंतर निशा खोलीच्या बाहेर गेली आणि भिंतीवर स्वतःचे डोके आपटण्यास सुरुवात केली आणि मग तिनेच पोलिसांना बोलावले. करणचे असे देखील म्हणणे आहे की, पोलीस येण्यापूर्वी निशाच्या भावानेही तिला मारहाण केली होती. करणने यासंदर्भात स्वतःचे स्पष्टीकरण देत, आपली बाजू स्पष्ट केली आहे. मात्र, निशा म्हणाली की ती तिच्या वकिलाशी बोलल्यानंतरच काही उत्तर देईल.

करणची कारकीर्द

तब्बल सात वर्ष करण ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. यात त्याने नैतिक सिंघानियाची भूमिका साकारली होती. शोमध्ये तो अभिनेत्री हिना खानसोबत दिसला होता. करण मेहरा या शोमधून प्रचंड हिट ठरला होता. सध्या या शोमध्ये मोहसीन खान आणि शिवांगी जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. करण मेहराने बिग बॉस 10 मध्येही भाग घेतला होता. गेले काही दिवस करण आपल्या आगामी पंजाबी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता आणि निशा आपल्या मुलासमवेत मुंबईत होती. 2012 साली निशा आणि करणचे लग्न झाले. यानंतर, 2017 मध्ये हे दांपत्य एका मुलाचे पालक बनले.

(Nisha Rawal Assault Case Actor Karan Mehra gives clarification on allegations)

हेही वाचा :

Photo: निळाशार सागर, रेताळ आणि स्वच्छ समुद्र किनारा… अन् ‘टकाटक गर्ल’ प्रणालीच्या मनमोहक अदा

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.