AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi | या अभिनेत्यासोबत ब्रेकअपनंतर नोरा फतेही नैराश्यात बुडली, 2 महिने होती नैराश्यात, यानंतर

नोरा फतेही आज जरी बॉलिवूडमधील फेमस चेहरा असली तरीही नोराने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार देखील बघितले आहेत.

Nora Fatehi | या अभिनेत्यासोबत ब्रेकअपनंतर नोरा फतेही नैराश्यात बुडली, 2 महिने होती नैराश्यात, यानंतर
| Updated on: Oct 20, 2022 | 7:30 AM
Share

मुंबई : अभिनेत्री आणि बेस्ट डान्सर नोरा फतेहीने (Nora Fatehi) अत्यंत कमी वेळामध्ये बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. सुरूवातीच्या काळात नोराने संघर्ष केला. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) नोराचेही नाव आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला होता. सुकेशने जॅकलीनप्रमाणेच नोरालाही महागडे गिफ्ट दिले असल्याने याप्रकरणात नोराची देखील चाैकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नाव आल्याने नोराच्या अडचणींमध्ये (Difficulties) मोठी वाढ झाली होती. मात्र, यादरम्यान या सर्व गोष्टी बाजूला सारत नोराने आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केले.

नोरा फतेही आज जरी बॉलिवूडमधील फेमस चेहरा असली तरीही नोराने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार देखील बघितले आहेत. इतकेच नव्हे तर नोरा काही दिवस नैराश्यात देखील होती. यादरम्यान नोराने बॉलिवूड सोडून जाण्याचा विचार देखील केला होता.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार नोरा काही वर्ष अभिनेता अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, नेहमी उडणारे खटके यामुळे त्यांचे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही आणि शेवटी ब्रेकअप झाले. मात्र, यानंतर नोरा पुर्णपणे तुटली होती. यामधून बाहेर पडण्यासाठी नोराला जास्त वेळ लागला.

एका मुलाखतीदरम्यान नोरा फतेहीने सांगितले की, ब्रेकअपनंतरचा काळ माझ्या आयुष्यात सर्वात वाईट होता. इतकेच नाही तर मी तब्बल दोन महिने नैराश्यात होते. जवळपास सर्वच मुलींना यामधून जावे लागते. पण खरोखरच हा काळ माझ्यासाठी खूपच जास्त कठिण होता.

नोरा पुढे म्हणाली की, ब्रेकअपनंतर मी दोन महिने नैराश्यात होते. परंतू त्यानंतर माझे विचारच बदलून गेले. आता या सर्व गोष्टींना मी वेगळ्या अॅंगलने पाहते. भारत चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये अचानक मी रडायला लागले. कारण ब्रेकअपनंतर मला काय करायचे होते, हे समजले. मी कुठेतरी माझा रस्ता भटकले होते, असेही नोरा म्हणाली.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.