AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी हा फोटो ठरला ‘फोटो ऑफ द इयर’, वाचा काय घडले थिएटरमध्ये

रणवीर सिंह याचे तर तीन चित्रपट एका मागून एक फ्लाॅप गेले आहेत. याला फक्त शाहरुख खान याचा पठाण चित्रपट अपवाद ठरलाय.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी हा फोटो ठरला 'फोटो ऑफ द इयर', वाचा काय घडले थिएटरमध्ये
| Updated on: Jan 28, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज झालाय. एका मागून एक असे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर पठाण चित्रपटाने केले आहेत. चार वर्षांपासून चाहते शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या याच पुनरागमनाची वाट पाहात होते. धडाकेबाज पध्दतीने आता शाहरुख खान याने बाॅलिवू़डमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत आपणच बाॅलिवूडचे किंग खान असल्याचे दाखून दिले आहे. पठाण चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, उगाच शाहरुख खान याला बाॅलिवूडचा किंग खान म्हटले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. यामध्ये आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टारचे देखील चित्रपट आहेत. रणवीर सिंह याचे तर तीन चित्रपट एका मागून एक फ्लाॅप गेले आहेत. याला फक्त शाहरुख खान याचा पठाण चित्रपट अपवाद ठरलाय.

कोरोनानंतर प्रेक्षकांचा मोबाईल आणि लॅपटाॅपवर चित्रपट पाहण्यावर अधिक भर होता. मात्र, शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात यशस्वी ठरलाय. प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटा विषयी मोठी क्रेझ आहे.

तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान याला अशा धडाकेबाज भूमिकेमध्ये पाहून चाहते भावूक झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. ५७ वयामध्येही शाहरुख खान याच्या अभिनयामध्ये पूर्वीचीच ताकद बघायला मिळत आहे.

नुकताच हार्दिक मेहता याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये हार्दिक मेहता हा शाहरुख खान याचे पठाण चित्रपटासाठी काैतुक करताना दिसत आहे. या पोस्टसोबतच हार्दिक मेहता याने एक अत्यंत भावूक फोटोही शेअर केलाय.

हार्दिक मेहता याने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, थिएटरमध्ये शाहरुख खान याचा एक चाहता चित्रपटातील सिल्हूटच्या सीनवेळी शाहरुख खान याला सिल्हूट करत आहे.

आता हाच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हार्दिक मेहता याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शाहरुख खान याचे काैतुक केले आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटानंतर सर्वचजण त्याच्या अभिनयाचे काैतुक करत आहेत.

या फोटोवर एका युजर्सने लिहिले की, बहुतेक हार्दिक मेहता याचे चित्रपटा ऐवजी इतरत्रच जास्त लक्ष होते. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून शाहरुख खान याचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात हे कळते.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.