AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियंका चाैधरी हिला शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाच्या ऑफर? अभिनेत्रीने सांगितले सत्य

एकता कपूर हिने घरातील सदस्यांना एक विषय देऊन अभिनय करण्यास सांगितले होते. त्यामध्ये सर्वात जबरदस्त अभिनय हा निम्रत काैर हिने केला. त्यानंतर एकता कपूर हिने आपल्या आगामी चित्रपटासाठी निम्रत काैर हिला साईन केले.

प्रियंका चाैधरी हिला शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाच्या ऑफर? अभिनेत्रीने सांगितले सत्य
| Updated on: Feb 14, 2023 | 5:14 PM
Share

मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले पार पडला असून बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) ला त्याचा विजेता मिळाला आहे. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकांचे नशीब उजळते आणि थेट बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहनाज गिल हे आहे. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शहनाज गिल हिला थेट सलमान खान याचा चित्रपट मिळाला आहे. बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये धमाल केलीये. बिग बाॅस 16 ला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम देखील मिळाले आहे. काल फराह खान हिने बिग बाॅसच्या घरातील सर्व स्पर्धेकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये मंडळी धमाल करताना दिसली. आता पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. निम्रत काैर हिला बिग बाॅसच्या घरात असताना एकता कपूर (Ekta Kapoor) हिच्या चित्रपटाची ऑफर मिळाली. एकता कपूर हिने घरातील सदस्यांना एक विषय देऊन अभिनय करण्यास सांगितले होते. त्यामध्ये सर्वात जबरदस्त अभिनय हा निम्रत काैर हिने केला. त्यानंतर एकता कपूर हिने आपल्या आगामी चित्रपटासाठी निम्रत काैर हिला साईन केले.

गेल्या दोन दिवसांपासून एक चर्चा सतत सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे की, प्रियंका चाैधरी हिला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली असून ती थेट शाहरुख खान याच्या आगामी डंकी या चित्रपटामध्ये दिसणार असून ती शाहरुख खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

इतकेच नाही तर शाहरुख खान याच्याच फक्त चित्रपटाची ऑफर नसून सलमान खान याच्याही चित्रपटामध्ये प्रियंका चाैधरी ही मुख्य भूमिकेत असणार आहे. या सर्व चर्चांमुळे प्रियंका चाैधरी हिचे चाहते आनंदी झाले.

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटाच्या ऑफर प्रियंका चाैधरी हिला आल्या या चर्चांवर आता स्वत: प्रियंका चाैधरी हिने मोठे भाष्य केले आहे. या चर्चांमध्ये किती सत्य आहे, हे देखील प्रियंका चाैधरी हिने सांगून टाकले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियंका चाैधरी हिने यावर खुलासा केला.

प्रियंका चाैधरी म्हणाली की, मी आताच बिग बाॅसच्या घराबाहेर आले आहे. परंतू माझ्यापर्यंत अजून कोणत्याही चित्रपटाची ऑफर आली नाहीये. याबद्दल मला माहिती नाही. कारण मी इतक्या दिवसांनंतर बाहेर आलीये.

सलमान खानच्या चित्रपटाची अजून ऑफर नाही आली. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की, सलमान सरांनी मला बाहेर आल्यावर भेटण्यास सांगितले होते…परंतू मला अजून कोणत्याच चित्रपटाची आॅफर मिळाली नाहीये.

शाहरुख खान आणि सलमान खान हे माझ्याकडे एखाद्या देवासारखे आहेत. यावेळी बोलताना प्रियंका चाैधरी म्हणाली, मला जर चित्रपटांच्या ऑफर आल्या तर मी चित्रपटांमध्येच काम करेल. मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणार नाही.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच