R Madhavan: “आता पुरे झालं..”; आर. माधवनने ऑस्करमध्ये ‘छेल्लो शो’च्या एण्ट्रीबाबत केलं मोठं विधान

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या गुजराती चित्रपटावर माधवनचं मत

R Madhavan: आता पुरे झालं..; आर. माधवनने ऑस्करमध्ये 'छेल्लो शो'च्या एण्ट्रीबाबत केलं मोठं विधान
आर. माधवनने ऑस्करमध्ये 'छेल्लो शो'च्या एण्ट्रीबाबत केलं मोठं विधान Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 3:41 PM

गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर पुरस्काराची (Oscar Award) खूप चर्चा आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा 12 मार्च 2023 रोजी होईल. त्यासाठी चित्रपटांच्या अधिकृत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारतातडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. या शर्यतीत एस एस राजामौलीच्या ‘RRR’ आणि विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची जोरदार चर्चा होती. इतकंच नव्हे तर आता अभिनेता आर. माधवननेही (R Madhavan) त्याचा ‘रॉकेटरी’ हा चित्रपट ऑस्करला पाठवायला हवा होता, असं म्हटलं आहे.

ऑस्करसाठी ‘रॉकेटरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचाही विचार केला पाहिजे, असं माधवन आणि अभिनेता दर्शन कुमार मस्करीत म्हणाले. “मला वाटतं रॉकेटरी आणि द काश्मीर फाइल्स हेसुद्धा पाठवायला हवेत. तो (दर्शन) काश्मीर फाइल्ससाठी तर मी ‘रॉकेटरी’साठी मोहीम सुरू करत आहे,” असं माधवन हसत म्हणाला. मात्र त्यानंतर त्याने छेल्लो शो या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

“मला आशा आहे की ऑस्करच्या बाबतीत देशात गोष्टी चांगल्या होतील. आता पुरे झालं. आता आपण तिथे काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं माधवन म्हणाला.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नाही. ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांनी ऑस्करमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मी त्यांचं अभिनंदन करतो. मला अजून काही बोलायचं नाहीये. मला या सर्व गोष्टींची पर्वा नाही.”

सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि एस एस राजामौलीचा ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची चर्चा होती. हे दोन्ही चित्रपट देशाने ऑस्करसाठी पाठवावेत, अशी चाहत्यांची इच्छा होती, मात्र ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने ऑस्करमध्ये प्रवेश केल्याने चाहत्यांना धक्का बसला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.