AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज कुंद्राचा मोठा निर्णय, फेसबुक-इंस्टाग्रामसह सोशल मीडियाला अलविदा!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असे. मात्र, पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर राजचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज कुंद्राचा मोठा निर्णय, फेसबुक-इंस्टाग्रामसह सोशल मीडियाला अलविदा!
Shilpa-raj
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 12:53 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असे. मात्र, पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर राजचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. राज कुंद्राला 2 महिने तुरुंगात राहावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यापासून आजतागायत राज यांनी माध्यमांसमोर किंवा जाहीर हजेरी लावलेली नाही.

मात्र, आता राजने अचानक त्याची इन्स्टाग्राम आणि ट्विटर अशी सर्व सोशल मीडिया खाती हटवली आहेत. राज कुंद्राने हा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शिल्पाने अद्याप राजसोबतचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. अलीकडेच शिल्पाने करवा चौथचा उपवास ठेवला होता. दरवर्षी ती यावेळी राजसोबतचे फोटो शेअर करत असायची. यावेळीही शिल्पाने राजसाठी उपवास ठेवला होता, पण त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले नाहीत. शिल्पाने तिचा सिंगल फोटो नक्कीच शेअर केला होता. एवढेच नाही तर नुकतीच शिल्पा दोन्ही मुलांसह अलिबागला रवाना झाली. मात्र, राज त्यांच्यासोबत दिसला नाही.

मला बळीचा बकरा बनवले!

राज यांना 50 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मिळाला आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे राज कुन्द्राने आपल्या अर्जात लिहिले होते. यासोबतच त्याने दावा केला आहे की, त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीबाबत तो अॅडल्ट कंटेंट तयार करण्यात सक्रिय असल्याचा कोणताही पुरावा नाही. व्हिडीओ शूटिंगमध्ये गुंतल्याची आरोपपत्रात आपल्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असेही त्याने म्हटले होते. एफआयआरमध्येही त्याचे नाव नव्हते, पण पोलिसांनी त्याला जबरदस्तीने या प्रकरणात ओढले, असल्याचा दावा त्याने केला.

शिल्पाने केला होता राजसाठी नवस?

राजच्या जामीनापूर्वी शिल्पा वैष्णोदेवीच्या मंदिरात गेली होती. यानंतर राज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी शिल्पाने तिचे केस कापले. शिल्पा शेट्टीचा हा हेअरकट खूपच वेगळा होता. तिने मागून अर्धे केस कापले होते. शिल्पाने तिच्या हेअरकटचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला, जो चांगलाच व्हायरल झाला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असे बोलले जात होते की, शिल्पाने आपले केस कापले कारण तिने राजला तुरुंगातून बाहेर येण्यासाठी नवस मागितला होता. आता हे कारण कितपत योग्य आणि किती चुकीचे हे फक्त शिल्पाच सांगू शकते.

पाहा हेअरकट व्हिडीओ :

शिल्पाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवट ‘हंगामा 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाद्वारे शिल्पाने 14 वर्षांनी पुनरागमन केले होते. आता शिल्पा ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेटिया मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

लग्न सलमानचं, काळजी महेश मांजरेकरांना! म्हणतायत ‘तो आतून एकटा पडलाय, त्याला…’

Zee Marathi Awards 2021 : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.