AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant Mother Died : डोक्यावरून मायेचा हात गेला… गमावण्यासारखं… आय लव्ह यू आई… राखी हिची भावूक पोस्ट

राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती आईचा मृतदेह रुग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसत आहे. आईचे पार्थिव नेताना ती रडताना दिसत आहे.

Rakhi Sawant Mother Died : डोक्यावरून मायेचा हात गेला... गमावण्यासारखं... आय लव्ह यू आई... राखी हिची भावूक पोस्ट
rakhi sawantImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 29, 2023 | 10:02 AM
Share

मुंबई: ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगामुळे राखी सावंत हिची आई जया भेडा यांचा मृत्यू झाला आहे. तब्बल दोन महिने रुग्णालयात मृत्यूशी त्यांनी झुंज दिली. परंतु काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या दिवसात जया भेडा यांची तब्येत अत्यंत बिघडली होती. त्यांचा व्हिडीओ राखी सावंतने शेअर केला आहे. काळीज पिळवटून टाकणारा हा अंतिम क्षणातील व्हिडीओ आहे.

राखी सावंतची आई जया भेडा यांनी काल रात्री जगाचा निरोप घेतला. आईच्या मृत्यूचा राखीला प्रचंड धक्का बसला आहे. आई गेल्यामुळे राखी एकाकी पडली असून रडून रडून तिची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

आईसाठी सर्वकाही

राखी आईच्या अत्यंत जवळची होती. आईच्या सुखदुखात ती सर्वात पुढे असायची. आई आजारी पडली तेव्हा तिने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. दोन महिने त्या रुग्णालयात अॅडमिट होत्या. आईच्या आजारपणाला पैसा कमी पडू नये म्हणून राखी बिग बॉसच्या शोमध्येही गेली होती. एवढंच काय तिने आईसाठी लग्नही केलं होतं.

आईसाठी देवाकडे प्रार्थना

राखीने तिची आई जया भेडा यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जया भेडा यांच्या अंतिम क्षणातील हा व्हिडीओ आहे. जया या रुग्णालयात बेडवर पहुडलेल्या आहेत. त्यांना श्वास घेताना त्रास होत असल्याचं या व्हिडीओतून दिसतंय. तर राखी आईच्या बेडजवळ जमिनीवर बसून हमसून हमसून रडताना दिसत आहे.

रडत रडतच आईला बरे वाटावे म्हणून देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. आईला वाचवण्यासाठी राखीने जंग जंग पछाडले. पाण्यासारखा पैसा ओतला. उत्तमोत्तम उपचार दिले. पण काळाला ते मंजूर नव्हते.

आय लव्ह यू आई…

आज माझ्या डोक्यावरून मायेचा हात गेला. आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. आय लव्ह यू आई… आई, तुझ्याशिवाय काहीच नाही. आता माझा आवाज कोण ऐकेल. कोण मला हृदयाला बिलगून धरेल. आता मी काय करू आई? मी कुठे जाऊ?; अशी भावनिक पोस्ट राखीने लिहिली आहे.

आईला नेताना राखीने टाहो फोडला

राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती आईचा मृतदेह रुग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसत आहे. आईचे पार्थिव नेताना ती रडताना दिसत आहे. राखी देहभान विसरून रडताना दिसत आहे.

त्यामुळे तिला सांभाळणं सुद्धा तिच्या नातेवाईकांना कठिण होऊन गेल्याचं दिसत आहे. राखीचं हे रडणं पाहून तिच्या चाहत्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याशिवाय राहिले नाही. तिचे चाहते तिची सांत्वना करतानाही दिसत आहे.

आज अंत्यसंस्कार

राखीच्या आईच्या पार्थिवावर अंधेरी पश्चिमेतील महापालिकेच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. दुपारी 12 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. तशी माहिती राखीच्या इन्स्टाग्रामवरून देण्यात आली आहे.

गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.