‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिकासोबत सलमानचा खास डान्स; Video एकदा पहाच!

'नॅशनल क्रश'च्या इशाऱ्यांवर थिरकला सलमान खान

'सामी सामी' गाण्यावर रश्मिकासोबत सलमानचा खास डान्स; Video एकदा पहाच!
Salman and Rashmika
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 29, 2022 | 4:16 PM

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ अजूनही पहायला मिळते. या चित्रपटातील डायलॉग, गाणी, गाण्यांवरील डान्स तुफान गाजला. ‘सामी सामी’ (Sami Sami) या गाण्यावरील रश्मिकाचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या गाण्यावर अनेकांनी व्हिडीओ शूट करून पोस्ट केले. आता सलमान खानसुद्धा (Salman Khan) या गाण्यावर थिरकताना दिसला. ‘सामी सामी’ या गाण्यावर त्याने रश्मिकासोबत डान्स केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात रश्मिकाने हजेरी लावली होती. यावेळी रश्मिकाला सलमानच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मंचावर आल्यानंतर तिला सूत्रसंचालक मनिष पॉलने सामी सामी गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली. यावेळी तिच्यासोबत सलमाननेही डान्स केला.

सामी सामी या गाण्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वीच शाळेतल्या एका मुलीने या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ रश्मिकाने शेअर केला होता. त्या मुलीला भेटण्याची इच्छाही तिने व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त दक्षिणेतच नाही तर देशाच्या इतर भागांतही तुफान गाजला. आता या चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात झाली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें