‘आशिकी 3’ चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार असल्याची चर्चा…

आशिकी 3 च्या निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही अभिनेत्रीला फायनल केले नाही. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिकाला या चित्रपटासाठी फायनल केले जाऊ शकते.

आशिकी 3 चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार असल्याची चर्चा...
| Updated on: Sep 11, 2022 | 7:32 AM

मुंबई : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जादूचा करिश्मा दाखवण्यासाठी सज्ज आहे. रश्मिका ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही रिलीज झालायं. बॉलिवूडच्या (Bollywood) बिग बीसोबत काम करण्याची सुवर्णसंधी रश्मिका मिळालीयं. आता रश्मिकासंदर्भात अजून एक मोठी बातमी पुढे येते आहे. रश्मिका मंदान्ना ‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलयं.

आशिकी 3 चित्रपटासाठी या तीन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

आशिकी 3 च्या निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही अभिनेत्रीला फायनल केले नाही. मात्र, या चित्रपटासाठी रश्मिकाच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिकाला या चित्रपटासाठी फायनल केले जाऊ शकते. कार्तिक आर्यनसोबत चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका करण्यासाठी श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांच्याही नावाची चर्चा सुरूयं. मात्र, यामध्ये सर्वात जास्त रश्मिकाच्या नावाची चर्चा आहे. चित्रपट निर्माते या तिघींपैकी नेमकी कोणाला संधी देतात, हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

रश्मिका मंदान्ना आणि कार्तिक आर्यनची जोडी प्रेक्षकांना आवडली

नुकतेच रश्मिका मंदान्ना आणि कार्तिक आर्यन यांनी एका चॉकलेट ब्रँडसाठी एक जाहिरात शूट केली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना देखील रश्मिका आणि कार्तिकची जोडी प्रचंड आवडलीयं. यामुळे चित्रपट निर्माते इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त रश्मिकाच्या नावाचा विचार जास्त करत असल्याची माहिती मिळालीयं. याच महिन्यात रश्मिका आणि बिग बींचा गुडबाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं. या चित्रपटात रश्मिका एका मुलीच्या आणि अमिताभ बच्चन हे वडिलांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातून वडिल आणि मुलीमध्ये असलेले सुंदर नाते दाखवले जाणार आहे.