AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरोखरच पाकिस्तानमध्ये ‘शेरशाह’ वर बंदी घातलीय का? जाणून घ्या यामागील सत्य…

अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे.

खरोखरच पाकिस्तानमध्ये 'शेरशाह' वर बंदी घातलीय का? जाणून घ्या यामागील सत्य...
शेरशाह चित्रपट
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 11:10 AM
Share

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा चित्रपट शेरशाह नुकताच प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी अॅमेझॉनवर शेरशाह रिलीज केला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट OTT वर रिलीज करण्यात आला आहे. (Really shershaah movie is banned in pakistan?)

आता अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये अशी बातमी आहे की, पाकिस्तानमध्ये शेरशाह चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

चित्रपट बंदीबद्दल कोणी दिली माहिती

NBT च्या बातमीनुसार, एक पाकिस्तानी YouTuber Ahmr Khokhar ने त्याचे YouTube चॅनेल Mr. Ahmr द्वारे ही माहिती आता सर्वांसमोर आणली आहे. यामध्ये म्हटंले आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी असली, तरी तो पाहायचा आहे. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज झाला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट नाही.

मात्र, जेव्हापासून ही गोष्ट समोर आली आहे, तेव्हापासून चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक असा अंदाज लावत आहेत की पाकिस्तानला कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा दाखवायची नाही, त्यामुळे चित्रपटावर बंदी घातली गेली असावी. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटावर बंदी घालण्याची ही पहिली वेळ नाही.

यापूर्वी फँटम चित्रपटावर बंदी होती. तसेच बैंगिस्तान, एक था टाइगर , राझंणा, भाग मिल्खा भाग, एजेंट विनोद, तेरे बिन लादेन असे अनेक चित्रपट आहेत. ज्यांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आता चाहत्यांच्या नजरा अधिकृत विधानावर आहेत, जेव्हा शेरशाहचे निर्माते स्पष्ट करतात की या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये खरोखर बंदी आहे की नाही.

संबंधित बातम्या : 

Salman Khan : सलमान खानला विमानतळावर थांबवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफ अधिकाऱ्याला सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस

Good News : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘Maidaan’ आणि ‘RRR’ मध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर नाही

Tv9 Exclusive : पद्मिनी कोल्हापुरेंचे सेकंड इनिंगचे गाणेही लोकप्रिय, दिग्गजांच्या साथीने धमाका लेबलचे गाणे हिट!

(Really shershaah movie is banned in pakistan?)

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.