Richa Chaddha: लग्नपत्रिका आहे की माचिस बॉक्स; रिचा-अलीचं हटके वेडिंग कार्ड व्हायरल

'गुड्डू भैय्या'ची लग्नपत्रिकाच आहे खास; व्हायरल फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

Richa Chaddha: लग्नपत्रिका आहे की माचिस बॉक्स; रिचा-अलीचं हटके वेडिंग कार्ड व्हायरल
Richa Chaddha Wedding Card
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 21, 2022 | 6:54 PM

अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chaddha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लिव्ह-इनमध्ये राहिलेली ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नाबाबतच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यातच आता या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. रिचा आणि अलीची लग्नपत्रिका अगदीच वेगळी आणि हटके आहे.

लग्नपत्रिकेची हटके डिझाइन

रिचा आणि अली फजलच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे, जी पूर्णपणे वेगळी आहे. ही पत्रिका पाहता दोघं रेट्रो थीमवर लग्न करणार आहेत असं दिसतंय. ‘टाइम्स नाऊ’ने या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही पत्रिका माचिसच्या डब्ब्यासारखी आहे. सायकलवर बसलेली रिचा आणि अली यांचा स्केच त्यावर दिसून येत आहे. त्यावर ‘कपल मॅचेस’ असं लिहिलं आहे.

दिल्लीत होणार लग्न

रिचा आणि अली येत्या 4 ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीच्या जिमखाना क्लबमध्ये होणार असून त्यानंतर दिल्लीतच मोठं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. नंतर ही जोडी मुंबईतील मित्रपरिवारासाठी मुंबईतही रिसेप्शन आयोजित करणार असल्याचं कळतंय.

दिल्ली जिमखाना क्लब हे देशातील सर्वात जुनं आणि सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. या क्लबच्या सदस्यत्वासाठी जवळपास 37 वर्षांची वेटिंग लिस्ट असल्याचं सांगितलं जातं. या महिन्याच्या अखेरीस रिचा-अलीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात होईल.

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कायमच मनमोकळेपणे बोलणं पसंत केलं. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती. रिल लाईफ कपलने रिअल लाईफ कपल होण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें