ऋषी कपूर यांची अंगठी डिंपल कपाडियांच्या हातात दिसली अन् रागाने लालबुंद झाले राजेश खन्ना! वाचा किस्सा

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) जेव्हा आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा ऋषी कपूर यांनी आपल्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात केली होती. त्यावेळी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा 'बॉबी' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

ऋषी कपूर यांची अंगठी डिंपल कपाडियांच्या हातात दिसली अन् रागाने लालबुंद झाले राजेश खन्ना! वाचा किस्सा
Rishi Kapoor-Rajesh Khanna


मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) जेव्हा आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा ऋषी कपूर यांनी आपल्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात केली होती. त्यावेळी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा ‘बॉबी’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 16 वर्षीय डिंपल कपाडिया यांनी ऋषी कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बॉबी’ रिलीज झाल्यानंतर स्वतः ऋषी कपूर इंडस्ट्रीमध्ये एक मोठे नाव बनले. बॉबीच्या शूटिंग दरम्यानच राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया एकमेकांना आपले हृदय देऊन बसले होते.

अंगठी पाहून राजेश खन्ना संतापले!

ऋषी कपूर यांनी एका एका मुलाखती दरम्यान सांगितले की, राजेश खन्ना यांनी असे कृत्य केले होते की, त्यामुळे मला त्यांचा खूप राग आला होता. वास्तविक राजेश खन्ना यांनी तोपर्यंत डिंपल कपाडियाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण, एक दिवशी राजेश खन्ना यांना डिंपल कपाडियाच्या हातात अंगठी दिसताच, ते तिच्यावर खूप रागावले.

डिंपलच्या हातात ऋषी कपूर यांची अंगठी

खरंतर राजेश खन्ना त्यावेळी खूप रागावले होते. रागाच्या भरात राजेश खन्ना यांनी ती अंगठी डिंपल कपाडियाच्या हातातून काढून जुहू बीचवर कुठेतरी फेकली. ती सोन्याची अंगठी ऋषी कपूर यांची होती. ऋषी कपूर यांना जेव्हा हे कळले, तेव्हा ते खूप रागावले आणि डिंपल कपाडिया यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की राजेश खन्ना यांची ही कृती त्यांना अजिबात आवडली नाही.

ऋषी कपूरची माफी देखील मागितली नाही!

राजेश खन्ना यांनी याबद्दल कधीही ऋषी कपूर यांची माफी मागितली नाही. परंतु, ‘बॉबी’ चित्रपटात राजेश खन्ना यांनी निश्चितच अनेक समस्या निर्माण करण्यास सुरुवात केली. यासंदर्भातील एक किस्सा शेअर करताना ऋषी कपूर एका मीडिया वाहिनीशी खास बातचीत करताना म्हणाले होते, ‘आजही मी जुहू बीचवर माझी अंगठी शोधात असतो. कारण आता काका आपल्यामध्ये राहिले नाहीत, म्हणून जर मी या गोष्टी आता केल्या तर डिंपल मला मारतील’.

ऋषी कपूर यांना नाही आवडायचे राजेश खन्ना

ऋषी कपूर यांनी मीडिया वाहिनीशी केलेल्या विशेष संभाषणात सांगितले होते की, ‘मला राजेश खन्ना आवडत नव्हते, कारण ते माझ्या नायिकेला माझ्यापासून दूर नेत असत’. ते अंगठीचा किस्सा सांगताना म्हणाले की, ‘पण सर्वात मोठे कारण म्हणजे ती अंगठी मला एका मुलीने दिली होती. डिंपल कपाडियाने जेव्हा शूटिंग दरम्यान माझ्या हातात ती अंगठी पाहिली, तेव्हा त्यांनी ती माझ्याकडून घेतली आणि स्वतःच्या बोटात घातली. पण जेव्हा काकांनी ती अंगठी डिंपलच्या हातात पाहिली, तेव्हा त्यांनी ती तिच्या हातातून काढून समुद्राच्या मध्यभागी कुठेतरी फेकली. तेव्हापासून आणि या कारणामुळे मला काका आवडले नाहीत’.

बोटांवर मोजून सांगितली कारणे!

ऋषी कपूर यांनी हा किस्सा सांगताना ते का आवडायचे नाहीत याची कारणे अक्षरशः बोटांवर मोजली होती. यावेळी ऋषी कपूर म्हणाले होते की, ‘माझी अंगठी फेकली, माझ्या नायिकांना माझ्यापासून दूर नेले, मग तिच्याशी लग्न केले. त्यामुळे त्यांना नापसंत करण्याची अनेक कारणे माझ्याकडे आहेत.’ मात्र, आता हे दोन्हीही दिग्गज या जगात नाहीत.

हेही वाचा :

Raj Kundra Case | ‘राज काय करायचा हे मी विचारलेच नाही…’, अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब!

Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI