हिना खानसाठी धावली अन् अंकिता लोखंडे फसली, रोजलिनने खेचलं कोर्टात; पुढे काय?

हिना खान आणि रोजलिन यांच्यातील वादात पडणं अंकिता लोखंडेला चांगलंच महागात पडलं आहे. हिनाला कॅन्सर झालाय. हा कॅन्सर अत्यंत भयंकर असल्याचं तिचं म्हणणं आहे. तर रोजलिनने हिनाचा दावा खोडून काढला आहे. हिना लोकांसमोर चुकीची माहिती देत असल्याचं रोजलिनने म्हटलं आहे.

हिना खानसाठी धावली अन् अंकिता लोखंडे फसली, रोजलिनने खेचलं कोर्टात; पुढे काय?
Rozlyn khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2025 | 11:38 PM

अभिनेत्री रोजलिन खान ही हिना खान सारखीच कॅन्सरने ग्रस्त आहे. रोजलिनने हिना खानच्या काही स्टेटमेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्या कॅन्सरबाबत हिना खान लोकांना सांगत आहे, आणि जी ट्रीटमेंट हिना सांगत आहे, ती इतकीही सोपी नाहीये, असं सांगत हिनाने आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं रोजलिन म्हणाली होती. पण हिनाने रोजलिनला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही. परंतु अंकिता लोखंडेने या वादात उडी घेऊन रोजलिनला चांगलंच फटकारलं होतं. त्यामुळे रोजलिन चांगलीच संतापली असून तिने थेट अंकितालाच अंधेरी कोर्टात खेचलं आहे. रोजलिनने तिचे वकील अली काशिफ खान यांच्या माध्यमातून मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर रोजलिनचे वकील अली काशिफ खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अंकिता लोखंडेच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. रोजलिन ही एक फर्स्ट कॅन्सर पेशंट आहे. ती सध्या अनंत अडचणीचा सामना करत आहे. तिने काही लोकांना एक्सपोज करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक आपल्याला कॅन्सर असल्याची खोटी माहिती देत आहेत. काही लोक स्टेज 2 किंवा स्टेज 3 कॅन्सरला स्टेज 4 सांगत आहे. अशा लोकांना रोजलिन एक्सपोज करणार आहे, असं तिच्या वकिलाने म्हटलं आहे. तर अंकिताने रोजलिनच्या विधानाला चीप स्टंट म्हटलं होतं.

केस दाखल

अंकिताने रोजलिन विरोधात जे म्हटलं होतं, त्याचे स्क्रीन शॉर्ट कोर्टासमोर मांडले आहेत. रोजलिन तिचं काम करत आहे. अंकिताने थर्ड पार्टी बनून तिला त्रास देण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच आम्ही तिच्यावर केस दाखल केली आहे.

रोजलिन आणि तिचे वकील अली काशिफ खान दोघेही कोर्टात आले होते. दोघांनीही हिनाचं नाव घेतलं नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात हिना खानपासून सुरू झाली होती. पण रोजलिन आणि तिच्या वकिलांनी हिनाचं नाव न घेता तिच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. रोजलिनला काही लोकांना एक्सपोज करायचं होतं. काही लोक कॅन्सर सारखा आजार असल्याचं सांगून फायदा उठवण्याचं काम करत आहेत. कॅन्सरबाबतची चुकीची माहिती दिली जात आहे, असं त्यांनी म्हटलंय.