‘जग्वार कार चालकाने मुंबईत त्या रात्री…,’ बिग बॉस फेम अभिनेत्री इडन रोझ हिची खळबळजनक पोस्ट
मुंबईला कधीही न झोपणारे शहर म्हटले जाते, त्याबरोबरच या शहराला महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हटले जात असते. बिग बॉस-१८ ची कंटेस्टेंट अभिनेत्री इडन रोझ ही देखील हेच मानत होती. परंतू त्या रात्री तिच्यावर गुदरलेला भयानक प्रसंग तिने सांगितला आहे.

‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्री इडन रोझ आपल्या बिनधास्त स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल अनेकांना पसंत आहे. इडन रोझ तिच्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. परंतू मुंबईत तिला आलेल्या एका भयानक अनुभवाचा तिने सोशल मीडियावर उल्लेख करीत सारखे …काय ‘लेटेंट लेटेंट’ करत बसला आहात त्याआधी मुंबईला सुरक्षित ठेवा असा सल्ला अभिनेत्रीने पोलीस आणि राजकारण्यांना दिला आहे.
अभिनेत्री इडन रोझ हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने तिच्यावर त्या रात्री तिच्यावर गुदरलेल्या भयानक अनुभवाचा तिने उल्लेख केला आहे. अभिनेत्री इडन रोझ लिहिते की मी साल २०२० पासून मुंबईत रहात आहे. दिवस असो वा रात्र , मी कोणताही ड्रेस घातलेला असला तरी मी या शहरात स्वत:ला कधी असुरक्षित समजलेले नाही. परंतू या माझ्या समजूतीला त्या रात्री तडा गेला….
इडन रोज हीची पोस्ट




अभिनेत्री इडनने पोस्टमध्ये लिहीलेय की, ‘ या वेळी मी फूल ट्रॅक सुटमध्ये होते आणि आम्ही मास्क देखील लावलेला होता. माझ्या डोळ्यांशिवाय माझ्या शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. मी माझ्या मित्रासोबत जूहूवरुन वांद्र्याच्या दिशेने रिक्षाने चिल करण्यासाठी जात होतो. अनेकदा आम्हाला मास्क लावला तरी चाहते ओळखतात.परंतू यावेळी असे झाले नाही. जग्वार कारमधील एका इसमाने आमचा २० मिनिटे पाठलाग केला. तो वारंवार त्याची कार डाव्या आणि उजव्या बाजूला त्याची कार आमच्या रिक्षाच्या मागे पुढे चालवत होता. तो मद्याच्या नशेत आमचा पाठलाग करीत होता. तो न केवळ स्वत:चा जीव घालवत होत परंतू आमचा देखील जीव त्याने अशा ड्रायव्हींगमुळे धोक्यात आणत होता आणि आपण मागे हटणार नाही असे दर्शवू इच्छीत होते.’
लेटेंट-लेटेंट सोडा आणि महिलांना सुरक्षा पुरवा
इडनने लिहीले की, ‘आम्ही त्याचा चेहरा आणि कारनंबर प्लेटचा मोबाईलने फोटो काढला. तरीही तो आमचा त्याच्या जग्वार मधून पाठलाग करतच होता. म्हणजे तू काय दुबईपर्यंत घरी सोडणार मला ? तेव्हा आमच्या रिक्षा चालकाने रस्त्याच्या मध्ये रिक्षा थांबविली, त्याने त्याची कार तेथे थांबविली. त्यानंतर त्याने वेगाने युटर्न मारून आमचा पुन्हा आता आम्ही जोपर्यंत जुहू पोलिस ठाण्यात पोहचत नाही तोपर्यंत पाठलाग केला. सर्व जण लेटेंट-लेटेंट करत आहात. महिलांच्या सुरक्षेवर जरा लक्ष द्या तो माणूस जग्वार कारमध्ये होता आणि पैसेवालाही होता.त्याचा फोटो काढूनही त्याच्यात असे वागण्याचे साहस होते….’