Salman Khan | ‘टायगर भी जिंदा है और साप भी…’, एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा साप चावला! पाहा सलमान काय म्हणाला…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 27, 2021 | 11:58 AM

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याला त्याच्या पनवेल फार्महाऊसवर असताना सर्पदंश झाला होता. लाडक्या भाईजानला साप चावलाय कळताच चाहते देखील काळजीत पडले होते. सर्वांनाच सलमान खानची चिंता वाटत होती. यानंतर मात्र त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे.

Salman Khan | ‘टायगर भी जिंदा है और साप भी...’, एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा साप चावला! पाहा सलमान काय म्हणाला...
Photo Source - Twitter

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याला त्याच्या पनवेल फार्महाऊसवर असताना सर्पदंश झाला होता. लाडक्या भाईजानला साप चावलाय कळताच चाहते देखील काळजीत पडले होते. सर्वांनाच सलमान खानची चिंता वाटत होती. यानंतर मात्र त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त सलमानने मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर त्याने स्वतः ही घटना सांगितली.

दरवर्षी सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्याने तसेच केले. सलमानने फार्म हाऊसच्या बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला आणि साप चावल्याची संपूर्ण घटना सांगितली. तसेच, त्याच्या तब्येतीची माहिती दिली.

एक-दोन नव्हे तर, सलमान खानला तीनदा साप चावला!

एएनआयशी बोलताना सलमान खानने सांगितले की, माझ्या खोलीत एक साप आला होता, जो पाहून मुले घाबरली, म्हणून मी त्याला काठीने बाहेर काढत होतो. त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो माझ्या हातापर्यंत वर आला होता. त्यानंतर मी त्याला सोडता यावे, म्हणून दुसऱ्या हाताने त्याला पकडले. आमच्या कर्मचार्‍यांनी जेव्हा साप पाहिला तेव्हा त्यांना वाटले की, तो विषारी आहे, त्यानंतर त्यांनी जे केले, त्यामुळे सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावा घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आता तब्येत ठीक आहे!

शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सलमानला तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या सापाला देखील आम्ही सोबत घेऊन गेलो होतो, तिथे आम्हाला समजले की, तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यात आले. मी आता पूर्ण ठीक आहे.’

सापाला मारू नका!

सलमान खानने सांगितले की, मला बरे वाटत आहे आणि त्यांनी सापाला मारले नाही. मी परत आल्यावर त्यांनी सापाला देखील सोडून दिले. माझी बहीण खूप घाबरली होती म्हणून मी तिच्यासाठी सापासोबत फोटो देखील क्लिक केला. सापाशी मैत्री केली. त्यानंतर सलमान म्हणाला की, माझ्या बाबांनी विचारले काय झाले? साप जिवंत आहे का? म्हणून मी म्हणालो टायगरही जिवंत आहे, सापही जिवंत आहे! सलमान खान आज त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI