Morning Workout | समंथा बॅक टू रुटीन! सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, फिटनेस पाहून चाहतेही अवाक्!

साऊथची सुपरस्टार समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. समंथा अशी अभिनेत्री आहे जी, कोणत्याही गोष्टीत कोणापेक्षा कमी नाही. मग, ते जिममध्ये वजन उचलणे असो किंवा चाहत्यांना आश्चर्यकारक फॅशन सेन्सने प्रभावित करणे असो.

Morning Workout | समंथा बॅक टू रुटीन! सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, फिटनेस पाहून चाहतेही अवाक्!
Samantha

मुंबई : साऊथची सुपरस्टार समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. समंथा अशी अभिनेत्री आहे जी, कोणत्याही गोष्टीत कोणापेक्षा कमी नाही. मग, ते जिममध्ये वजन उचलणे असो किंवा चाहत्यांना आश्चर्यकारक फॅशन सेन्सने प्रभावित करणे असो. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कठीण वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री 30 किलो दुप्पट वजन उचलून स्क्वॅट करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, मी फक्त माझ्या फिटनेस प्रशिक्षकाच्या भीतीपोटी हे काम करत आहे. अन्यथा मी कोणासाठी वजनात दुहेरी वाढ करणार नाही. माझ्या अर्ध्या आकाराच्या शरीराकडे पहा. यासह, तिने एक हसणारा इमोजी देखील शेअर केला आहे.

पाहा पोस्ट :

Samntha

समंथा एक फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. अभिनेत्री एअरियल योगा, जिम्नॅस्टिक, वेटलिफ्टिंगपासून ध्यान करण्यापर्यंत सगळे व्यायाम प्रकार करते. सामंथा योग्य खाणे आणि जिममध्ये घाम गाळणे यावर विश्वास ठेवते. अभिनेत्री अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करते.

समंथा कामावर लक्ष केंद्रित करत आहे!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पती नागा चैतन्यपासून विभक्त झाली आहे. या कठीण काळात स्वतःला कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर ठेवण्यासाठी, ती तिच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. याशिवाय अभिनेत्रीने एक महिला केंद्रित चित्रपट साईन केला आहे. हा एक स्त्रीभिमुख चित्रपट असेल. मात्र कोणत्याही चित्रपटासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

काही दिवसांपूर्वी झालाय घटस्फोट!

सामंथा रूथ प्रभू हिने काही दिवसांपूर्वी तिचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहते खूप दु:खी झाले आहेत. दाक्षिणात्य या सुपरस्टार जोडप्याच्या घटस्फोटाने चाहते आश्चर्यचकित झाले. समंथा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विभक्त झाल्याची माहिती दिली होती. 2017मध्ये समंथा आणि नागा विवाहबंधनात अडकले होते. सामंथाने सोशल मीडियावरील तिच्या अकाऊंटवरून तिचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र, दोघांपैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. अलीकडेच, नागाच्या चित्रपट लव्ह स्टोरीच्या पार्टीतही समंथा कुठेही दिसली नव्हती, तेव्हाच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला होता.

हेही वाचा :

‘A फक्त तूच…’, नव्या चित्रपटात चिन्मय उदगीरकर – सुरुची आडारकरची फ्रेश जोडी पहिल्यांदाच दिसणार एकत्र!

Karnan | ‘इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये धनुषच्या चित्रपटाची बाजी, ‘कर्णन’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटा’चा बहुमान!

Money Laundering Case : तीन वेळा ईडीचा समन्स, जॅकलिन फर्नांडिस चौकशीला हजर राहण्याची शक्यता!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI