Money Laundering Case : तीन वेळा ईडीचा समन्स, जॅकलिन फर्नांडिस चौकशीला हजर राहण्याची शक्यता!

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोमवारी (18 ऑक्टोबर) ईडीसमोर तपासात सामील होणार आहे. याआधी ईडीने जॅकलिनला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण, अभिनेत्री कामाचा हवाला देत पोहोचली नव्हती. सोमवारी ती या तपासात सामील होऊ शकते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे.

Money Laundering Case : तीन वेळा ईडीचा समन्स, जॅकलिन फर्नांडिस चौकशीला हजर राहण्याची शक्यता!
Jacqulin

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोमवारी (18 ऑक्टोबर) ईडीसमोर तपासात सामील होणार आहे. याआधी ईडीने जॅकलिनला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. पण, अभिनेत्री कामाचा हवाला देत पोहोचली नव्हती. सोमवारी ती या तपासात सामील होऊ शकते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे.

शनिवारी, जॅकलिनला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती आली नाही आणि सोमवारी हजर राहू असे सांगितले. तसेच, अभिनेत्रीला मागील तीन वर्षांच्या बँक स्टेटमेंट आणि आर्थिक व्यवहारांसह ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.

16 ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले समन्स!

ईडीने जॅकलिनला 16 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. वैयक्तिक कारणास्तव अभिनेत्रीने काही दिवसांची मुदतवाढ मागितली होती. यानंतर ईडीने 18 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी तिसरा समन्स पाठवला होता. जॅकलिनला 30 ऑगस्टला ईडीने प्रथम बोलावले होते. त्या दरम्यान अभिनेत्रीची सुमारे 5 तास चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सुकेश चंद्र शेखर याच्याबद्दल अनेक महत्वाची माहिती देण्यात आली. यानंतर, तिला 25 सप्टेंबरला बोलावण्यात आले, पण तरीही जॅकलिन हजार झाली नाही.

नोरा फतेही हिचीही चौकशी करण्यात आली

या प्रकरणी ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी केली आहे. अभिनेत्रीने स्वतःला या प्रकरणाची साक्षीदार आणि बळी म्हणून वर्णन केले आहे. ईडीने अभिनेत्रीची दोनदा चौकशी केली आहे.

अनेक कलाकारांना अडकवण्याचा प्रयत्न झाला!

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश आणि लीनाला अटक करण्यात आली आहे. सुरेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. तिच्या पहिल्या वक्तव्यात अभिनेत्रीने सुकेशच्या विरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे दिले होते. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणी सुकेश चंद्र शेखर आणि त्यांची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश नोरा, जॅकलिनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना गोवण्याचा कट रचण्यात आला होता.

लीना पॉलच्या मदतीने फसवणूक करायची

पोलिसांच्या ताब्यात आरोपी सुकेश कथित पत्नी लीना पॉलच्या मदतीने फसवणूक करायचा. सुकेश त्याची पत्नी लीनाच्या मदतीने तुरुंगातून फसवणूक करणारी टोळी चालवत असे. पोलिसांच्या अटकेमध्ये लीनाने सांगितले होते की, ती सुधीर आणि जोएल नावाच्या दोन लोकांसोबत फसवलेले पैसे लपवायची.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण 200 कोटींच्या खंडणीचे आहे, त्यातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून एवढी मोठी रक्कम वसूल केली होती. यामुळे तो तुरुंगात आहे. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही सापडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणास्तव लीना पॉलचीही तासन्तास चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सांगण्यात आले की, पॉलने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदितीची फसवणूक करण्यासाठी सुकेशला कथितपणे मदत केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सुकेश आणि त्याच्या पत्नीशिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Kajol : लाख मोलाची बनारसी साडी परिधान करत काजोलची दुर्गा पूजेला हजेरी, शेअर केले फोटो

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात लीपलॉक सीन, मायशा-ईशानची लव्हस्टोरीने ओलांडल्या मर्यादा!

Gadar 2 | सनी देओल जुन्याच कलाकारांसोबत आपली प्रेमकथा पुढे नेणार, जाणून घ्या ‘गदर 2’ कधी होणार रिलीज?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI