AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | सनी देओल जुन्याच कलाकारांसोबत आपली प्रेमकथा पुढे नेणार, जाणून घ्या ‘गदर 2’ कधी होणार रिलीज?

बॉलिवूड स्टार सनी देओलने (Sunny Deol) आज (15 ऑक्टोबर) जाहीर केले आहे की, तो त्याच्या 2001च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar : Ek Prem Katha) घेऊन येत आहे.

Gadar 2 | सनी देओल जुन्याच कलाकारांसोबत आपली प्रेमकथा पुढे नेणार, जाणून घ्या ‘गदर 2’ कधी होणार रिलीज?
Gadar 2
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 1:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार सनी देओलने (Sunny Deol) आज (15 ऑक्टोबर) जाहीर केले आहे की, तो त्याच्या 2001च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar : Ek Prem Katha) घेऊन येत आहे. काल म्हणजेच गुरुवारी, सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ती पाहिल्यानंतर चाहत्यांना कल्पना आली की, सनी देओल त्याच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आणणार आहे आणि आता सनी देओलने स्वतः या बातमीचे एक नवीन अपडेट दिले आहे. पोस्ट शेअर करता यावर शिक्कामोर्तब केले आहे.

64 वर्षीय अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ही घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करताना सनी देओलने सांगितले की, गदरचा दुसरा भाग पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर करत सनी देओलने आपल्या पोस्टसह लिहिले – ‘अखेर दोन दशकांनंतर प्रतीक्षा संपली. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या समोर ‘गदर 2’चे मोशन पोस्टर सादर करत आहे. कथा अजून पुढे सुरु आहे…’

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

जुन्या कलाकारांसह पुढे जाईल ही प्रेमकथा

या चित्रपटासाठी सनी देओलने पुन्हा एकदा चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांच्याशी हात मिळवला आहे. गदरच्या पहिल्या कलाकारासोबत ही प्रेमकथा पुढे नेली जाईल म्हणजेच चित्रपटात सनी देओल सोबत फक्त अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसतील. आम्ही तुम्हाला सांगू की उत्कर्ष शर्मा हा तोच कलाकार आहे जो गदरमध्ये अमीषा आणि सनीचा मुलगा बनला होता.

जेव्हा, ‘गदर : एक प्रेम कथा’ 2001मध्ये रिलीज झाला, तेव्हा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आजही, जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो, तेव्हा त्याचे चाहते स्क्रीनवर टक लावून मोठ्या उत्साहाने तो पाहतात. देशाच्या फाळणीवर आधारित या चित्रपटात एक शीख मुलगा तारा सिंह उर्फ ​​सनी देओल एक मुस्लिम मुलगी सकिना उर्फ ​​अमीषा पटेलच्या प्रेमात पडतो. हे प्रेम फाळणीच्या रक्ताने माखलेल्या भूमीवर सुरू होते. या चित्रपटाची कथा शक्तीमान यांनी लिहिली होती आणि अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केली होती.

‘गदर’ चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘गदर’ चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत आहेत.

मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सनीला पाहून संवाद विसरायची अमीषा

2001मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’मधील सनी देओलसोबत अमीषा पटेलची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली होती. पण अभिनेत्री अमीषा शूटच्या वेळी सनी देओलसोबत सीन करायला खूप घाबरत असे. सनीला पाहून ती आपले संवाद विसरत होती. सनी देओलसोबतच्या एका दृश्यात तिला जवळपास 17-18 रीटेक्स द्यावे लागायचे.

हेही वाचा :

Garbe Ki Raat : राहुल वैद्य अडचणीत, ‘गरबे की रात’ या नवीन गाण्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या

सपना चौधरीचे नवे हरयाणवी गाणे प्रदर्शित, व्हिडीओमध्ये दिसली ‘हरयाणवी क्वीन’ची नवी शैली!

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.