AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सपना चौधरीचे नवे हरयाणवी गाणे प्रदर्शित, व्हिडीओमध्ये दिसली ‘हरयाणवी क्वीन’ची नवी शैली!

‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी (Sapna Choudhary) आपल्या देसी शैलीने लाखो हृदयावर राज्य करते. तिची गाणी लग्न-पार्टीमध्ये अतिशय उत्साहाने वाजवली जातात, ज्यावर लोक खूप नाचतात. सपना चौधरीचे चाहते तिच्या प्रत्येक स्टाईलवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात.

सपना चौधरीचे नवे हरयाणवी गाणे प्रदर्शित, व्हिडीओमध्ये दिसली ‘हरयाणवी क्वीन’ची नवी शैली!
Sapna Chaudhary
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 12:36 PM
Share

मुंबई : ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी (Sapna Choudhary) आपल्या देसी शैलीने लाखो हृदयावर राज्य करते. तिची गाणी लग्न-पार्टीमध्ये अतिशय उत्साहाने वाजवली जातात, ज्यावर लोक खूप नाचतात. सपना चौधरीचे चाहते तिच्या प्रत्येक स्टाईलवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. ‘हरियाणवी डान्स क्वीन’ बद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ अशी आहे की, जेव्हा जेव्हा तिचे नवीन गाणे येते तेव्हा ते सुपरहिट होते. पुन्हा एकदा असेच काहीतरी घडताना दिसते आहे. आजकाल यूट्यूबवर तिचा एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. जो व्ह्यूच्या दृष्टीने जोरदार भरारी घेत आहे.

डान्सर सपना चौधरीचे प्रत्येक गाणे लाखोंनी व्ह्यूज गोळा करते. पण, तिच्या ‘चटक-मटक’ ने आजकाल यूट्यूबवर दहशत निर्माण केली आहे. रेणुका पवार यांनी गायलेल्या या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 650 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, जो स्वतःच एक मोठा रेकॉर्ड आहे. सपना चौधरीचे हे गाणे डिसेंबर 2020 मध्ये रिलीज झाले. म्हणजेच हे गाणे 1 वर्षापासून रिलीजही झाले आहे आणि या गाण्याने हा मोठा विक्रम केला आहे.

पाहा व्हिडीओ :

सपना चौधरीची देसी शैली

‘चटक-मटक’ मध्ये सपना चौधरी पूर्णपणे देसी अवतारात दिसली होती आणि या लूकने चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सपना चौधरीचा हा लूक खूप चर्चेत होता आणि आतापर्यंत अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये त्याची चर्चा आहे. यूट्यूबवर हे गाणे अजूनही गाजत आहे. रेणुका पवार यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल बिट्टू सारखी यांनी लिहिले असून कुलदीप राठी यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

आजही चाहते सपनासाठी वेडे!

तथापि, सपना चौधरीचे हे पहिले गाणे नाही, जे यासारख्या चाहत्यांमध्ये दहशत निर्माण करत आहे. देसी क्वीनचे प्रत्येक गाणे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. जेव्हा जेव्हा सपना चौधरीचे नवीन गाणे रिलीज होते, तेव्हा ते टॉप ट्रेंडमध्ये झळकते. सपना चौधरी तिच्या बिग बॉस 11 मध्ये तिच्या अद्भुत खेळीसाठी ओळखली जाते.

मृत्यूची अफवा चर्चेत

हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी (Sapna Choudhary) हे हरियाणातच नव्हे तर मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिची फॅन फॉलोइंग एका मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. आजही लाखो प्रेक्षक सपनाचे स्टेज शो पाहण्यासाठी एकत्र जमत असतात. सपना केवळ तिच्या नृत्यासाठीच नव्हे तर, तिच्या फोटोंमुळेही चर्चांमध्ये राहिली आहे. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते.

सपनाने तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. नुकतीच सपना चौधरी बद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली होती. सपना चौधरीबद्दल सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की, तिचा रस्ते अपघातादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचवेळी, या बातमीनंतर लोकांनी तिला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. तथापि, ही केवळ एक अफवा होती आणि ती तिच्या कुटुंबासह पूर्णपणे ठीक असल्याचे, तिच्या प्रवक्त्याने सांगितले.

सध्या काय करतेय अभिनेत्री?

सपना चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आजकाल ‘& टीव्ही’चा क्राईम शो ‘मौका-ए-वारदत’मध्ये रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासह शो होस्ट करताना दिसत आहे. याशिवाय सपनाने हरियाणवी इंडस्ट्री, भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सपना चौधरी ‘बिग बॉस 11’ चा भाग राहिली आहे.

हेही वाचा :

Rashmi Rocket Review : ‘जेंडर टेस्ट’च्या नावाखाली महिला खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडणारा चित्रपट, वाचा कसा आहे ‘रश्मी रॉकेट’..

Binge Watch : तापसीच्या ‘रश्मी रॉकेट’पासून शहनाजच्या ‘हौसला रख’पर्यंत, पाहा कोणकोणते चित्रपट आणि सीरीज रिलीज होणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.