AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sana Khanने चाखली 24 कॅरेट सोन्याच्या चहाची चव; किंमत वाचून व्हाल थक्क!

एकेकाळी अभिनयक्षेत्रात सक्रिय असलेली सना खान (SanaKhan) सध्या कलाविश्वापासून दूर आहे, असं असलं तरी सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते. धर्माचं कारण देत सनाने अभिनयक्षेत्राला रामराम केला होता. त्यानंतर तिने गुजरातमधील व्यावसायिक मुफ्ती अनस सैयदशी निकाह केला. इन्स्टाग्रामवर सनाचा मोठा चाहतावर्ग असून ती विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sana Khanने चाखली 24 कॅरेट सोन्याच्या चहाची चव; किंमत वाचून व्हाल थक्क!
Sana KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2022 | 2:33 PM
Share

एकेकाळी अभिनयक्षेत्रात सक्रिय असलेली सना खान (SanaKhan) सध्या कलाविश्वापासून दूर आहे, असं असलं तरी सोशल मीडियावर ती सतत चर्चेत असते. धर्माचं कारण देत सनाने अभिनयक्षेत्राला रामराम केला होता. त्यानंतर तिने गुजरातमधील व्यावसायिक मुफ्ती अनस सैयदशी निकाह केला. इन्स्टाग्रामवर सनाचा मोठा चाहतावर्ग असून ती विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनाने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती बुर्ज खलिफामधील (Burj Khalifa) अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये बसून सोन्याचा वर्ख असलेला चहा (Gold Plated Tea) पिताना दिसतेय. या चहाच्या फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं आहे.

24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेला चहा

दुबईतील बुर्ज खलिफामध्ये असलेल्या जगातील सर्वांत उंचावरील ‘अॅटमॉस्फिअर दुबई’ या रेस्तराँमध्ये बसून सना खान चहाचा आस्वाद घेताना पहायला मिळतेय. ‘कधी तुमच्या आयुष्याची तुलना अशा लोकांशी करू नका, जे आयतं मिळालेल्या पैशांवर मजा करतात. असे लोक जरी बाहेरून यशस्वी झाल्याचे दिसत असले तरी अल्लाहच्या समोर त्यांची काहीच किंमत नसते आणि हेच सर्वांत महत्त्वाचं असतं’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

सोन्याचा वर्ख असलेल्या चहाचे फोटो-

काय असेल या चहाची किंमत?

सना दुबईतील ज्या रेस्तराँमध्ये बसून या चहाचा आस्वाद घेतेय, तिथे चहा आणि इतर खाद्यपदार्थ अत्यंत महाग मिळतात. 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेल्या या चहाची किंमत 160 दिरहम म्हणजेच जवळपास 3300 रुपये आहे.

सना खानने 2005 मध्ये ‘ये है हाय सोसायटी’ या चित्रपटातून पदार्पण केलं. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘धन धना धन गोल’ या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटांमध्ये फारसं यश न मिळाल्याने ती दक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. 2014 मध्ये सना सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने ‘वजह तुम हो’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’सारखे चित्रपट केले. सना अभिनयक्षेत्र सोडण्यापूर्वी तिचं नाव कोरिओग्राफर आणि डान्सर मेल्विन लुईसशी जोडण्यात आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मेल्विनशी ब्रेकअप केल्यानंतर तिने धर्माचं कारण देत अभिनयक्षेत्रालाही कायमचा रामराम केला.

हेही वाचा:

मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

The Kashmir Files मध्ये वाशिमच्या मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली भूमिका; दोन महिने कडाक्याच्या थंडीत केलं शूटिंग

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.