AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर #Boycott Pathaan ट्रेंड, कारण काय? आमिर खानप्रमाणेच ‘शाहरुख खान’च्या चित्रपटाला बसणार फटका?

सातत्याने युजर्स सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

सोशल मीडियावर #Boycott Pathaan ट्रेंड, कारण काय? आमिर खानप्रमाणेच 'शाहरुख खान'च्या चित्रपटाला बसणार फटका?
| Updated on: Nov 04, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. पठाण चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. शाहरुख खान तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. मात्र, ज्यादिवशीपासून चित्रपटाचे टीझर रिलीज झाले, त्याचदिवशीपासून सोशल मीडियावर ‘#Boycott Pathaan’ हा ट्रेंड सुरू आहे. आता याचा काय फटका चित्रपटाला बसतो हे पाहवे लागणार आहे. सातत्याने युजर्स सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

पठाण चित्रपटाचा टीझर काहींना आवडला आहे तर काहींनी त्यावर टीका केलीये. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून अभिनेता शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे. पठाण चित्रपट हा हाॅलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे आणि या चित्रपटात काही वेगळे नसल्याचे देखील युजर्स म्हणत आहेत.

या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान दिसत होता.  फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुखचा लूक कुल दिसतोय.

Boycott trend

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, आतापासूनच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागलीये. जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जातोय. यामुळे थेट बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होतोय. अक्षय कुमार, आमिर खानसारख्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर कमाल दाखू शकले नाहीत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.