Shahid Kapoor | शाहिद कपूर याने सांगितली मनातील खदखद, म्हणाला एक अभिनेता असल्याने मोठी किंमत…

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी कायमच त्यांच्या मुलांना पापाराझी यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने स्टारकिड्स या शब्दावर मोठा आक्षेप घेतला होता. मीरा राजपूत (Mira Rajput) थेट म्हणाली होते की, मला स्टारकिड्स हा शब्द अजिबात […]

Shahid Kapoor | शाहिद कपूर याने सांगितली मनातील खदखद, म्हणाला एक अभिनेता असल्याने मोठी किंमत...
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 5:07 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी कायमच त्यांच्या मुलांना पापाराझी यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने स्टारकिड्स या शब्दावर मोठा आक्षेप घेतला होता. मीरा राजपूत (Mira Rajput) थेट म्हणाली होते की, मला स्टारकिड्स हा शब्द अजिबात आवडत नाही. हा शब्द कुठेच नसावा हिच माझी कायमच इच्छा आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूर हा त्याच्या फर्जीमुळे चर्चेत आहे. फर्जीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फर्जी ओटोटीवर रिलीज झाला होता. नुकताच शाहिद कपूर याने एक मुलाखती दिलीये, ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आलाय.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूर याने खुलासा केला आहे की, आपण एक अभिनेता असल्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांना नेमके काय सहन करावे लागते. या मुलाखतीनंतर शाहिद कपूर हा प्रचंड चर्चेत आहे. काही मोठे खुलासे देखील शाहिद कपूर याने या मुलाखतीमध्ये केले आहेत.

शाहिद कपूर म्हणाला की, मी माझ्या मुलांना नॉर्मल लाइफस्टाईल देऊ इच्छित आहे. एक पालक म्हणून माझे काम आहे की, मी माझ्या मुलांना नॉर्मल लाइफस्टाईल दिले पाहिजे. मुळात म्हणजे मी काही गोष्टी नक्कीच चेंज करू शकत नाही. जेंव्हा तुम्ही एक अभिनेता बनता, त्यावेळी कळते की तुमच्या लाईफमध्ये किती जास्त अडचणी असतात, त्यावेळी कळते की, आपल्यामुळे किती जास्त समस्या निर्माण होतात.

मला जेवढे जास्त शक्य आहे, तेवढी नॉर्मल लाइफस्टाईल मी माझ्या मुलांना देणार आहे. पुढे शाहिद कपूर म्हणाला की, मी स्वत: एका नॉर्मल लाइफस्टाईलसाठी कायमच झगडत असतो. माझ्या मुलांना आता हे समजले आहे की, त्यांचे वडील हे एक अभिनेते आहेत. शाहिद कपूर हा कोणत्याही लग्नामध्ये किंवा पार्ट्यांमध्ये त्याच्या मुलांना कधीच आणत नाही.

7 जुलै 2015 रोजी शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यापूर्वी शाहिद कपूर याचे नाव सतत करीना कपूर हिच्यासोबत जोडले जायचे. दोघांनी काही काळ ऐकमेकांना डेट देखील केली होते. करीना आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, शाहिद कपूर याने सर्वांना मोठा धक्का देत मीरा राजपूत हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. मीरा राजपूत ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.