करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् Shanaya Kapoor झाली ट्रोल; पहा Video

करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् Shanaya Kapoor झाली ट्रोल; पहा Video
Shanaya Kapoor
Image Credit source: Instagram

अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची ही मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) आहे. आगामी 'बेधडक' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वी तिच्या करिअरमधला पहिला रॅम्प वॉक (Shanaya Kapoor ramp walk) सोशल मीडियावर फारच चर्चेत आला आहे.

स्वाती वेमूल

|

Mar 27, 2022 | 4:26 PM

कपूर कुटुंबातील आणखी स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र पदार्पणापूर्वीच तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची ही मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) आहे. आगामी ‘बेधडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वी तिच्या करिअरमधला पहिला रॅम्प वॉक (Shanaya Kapoor ramp walk) सोशल मीडियावर फारच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish Malhotra) शोसाठी शनाया शो स्टॉपर होती. यावेळी तिने निळा-काळा-जांभळा रंगसंगतीचा कट-आऊट गाऊन परिधान केला होता. या रॅम्प वॉकचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी तिला तिच्या वॉकसाठी ट्रोल केलं आहे.

मनिष मल्होत्रासह शनायाचे कुटुंबीय आणि तिच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज फारसा आवडला नाही. ‘ही बदकासारखी का चालतेय’, असं एकाने विचारलं. तर ‘आतापर्यंतचा हा सर्वात वाईट ऱॅम्प वॉक होता’, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी तिला इतर अभिनेत्रींकडून शिकण्याचा सल्लाही दिला. दुसरीकडे शनायाची खास मैत्रीण सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी तिचं कौतुक केलं.

शनायाच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ-

निर्माता करण जोहर शनायाला बॉलिवूडमध्ये लाँच करत असून शशांक खैतान ‘बेधडक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात लक्ष्य आणि गुरफतेज पिरझादा हे दोन नवे चेहरेसुद्धा दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी शनायाने या चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.

बोल्ड फोटोंमुळे शनाया राहिली चर्चेत

शनाया तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे विविध फोटो शेअर करत असते. यामध्ये तिचे अनेक बोल्ड फोटोज देखील आहेत. विशेष म्हणजे ते फोटो बघितल्यानंतर शनाया नव्या स्टाईलसाठी नेहमी वेगवेगळे एक्सपरिमेंट करते, असं लक्षात येईल. शनायाने इन्स्टाग्रामवर बिकिनी लूक्सचे देखील फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा:

श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार

‘अनुपमा’मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने देवाचं कारण देत अभिनयक्षेत्राला केला रामराम!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें