AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | सपना हिने घेतले एक पाऊल मागे, नवाजुद्दीन सिद्दीकीला मोठा दिलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Nawazuddin Siddiqui | सपना हिने घेतले एक पाऊल मागे, नवाजुद्दीन सिद्दीकीला मोठा दिलासा, वाचा संपूर्ण प्रकरण
| Updated on: Feb 21, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने काही गंभीर आरोप केले. त्यानंतर हे सर्व प्रकरण थेट कोर्टात पोहचले. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी ही सतत अभिनेत्यावर आरोप करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ (Video) शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये निराश झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी दिसत होता. यामध्ये तो आलिया सिद्दीकी हिला समजवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो गेटमध्ये उभा राहिलेला दिसला. आलिया सिद्दीकी हिचे आरोप ऐकून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने देखील आलिया सिद्दीकी हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईतील घरामध्ये काम करणारी एक महिला कामगार दिसत होती, जिचे नाव सपना आहे. या व्हिडीओमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोपही केले होते.

हा व्हिडीओ शेअर करताना आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाना भारत सरकारच्या अधिकाऱ्यांकडे मदत देखील मागितली होती. या व्हिडीओमध्ये सपना म्हणते होती की, नवाजुद्दीन सरांच्या घरी मी अडकले आहे. मॅडम गेल्यावर सरांनी मला व्हिसा लावून दिला. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला पगार दिला जात नाहीये. मला माझे पैसे हवे आहेत आणि माझ्या घरी भारतामध्ये यायचे आहे.

आता सपना हिचा दुसरा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असून या व्हिडीओमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकी याची माफी मागितले आहे. या व्हिडीओमध्ये सपना म्हणते आहे की, मी दबाबमध्ये येऊन नवाजुद्दीन सिद्दीकी सरांवर आरोप केले होते. सपना म्हणाली, मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांबद्दल वाईट विचार करत नाही, कारण ते खूप चांगले आहेत.

पुढे सपना म्हणाली की, मी नवाजुद्दीन सिद्दीकी सरांची माफी मागते. आता सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सपनाच्या या व्हिडीओमुळे आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने केलेला दावा खोटा असल्याचे आता समोर येत आहे आणि सपनाच्या या व्हिडीओमुळे नवाजुद्दीन सिद्दीकीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'