Shefali Jariwala Death : शेफाली जरीवाला किती शिकली होती? शिक्षण ऐकून आश्चर्य वाटेल
शेफाली जरीवालाचे अकस्मात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. "कांटा लगा" या गाण्याने प्रसिद्ध झालेली शेफाली उच्चशिक्षित होती, तिने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून एम.टेक (IT) केले होते. तिचे बालपण दार्जिलिंग येथे गेले, अभिनयाची इच्छा असतानाही तिने उच्च शिक्षण घेतले.

कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचा मृत्यू झाला आहे. कार्डियक अरेस्ट आल्याने तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीची रात्री अचानक प्रकृती बिघडली. छातीत कळा येऊ लागल्याने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कांटा लगा गाण्यामुळे शेफालीची इमेज आयटम गर्ल अशी झाली होती. पण शेफाली ही उच्चशिक्षित होती हे अनेकांना माहीत नसेल. तिला अभिनेत्री व्हायचं होतं, बॉलिवूडची दुनिया तिला खुणावत होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही ती बॉलिवूडमध्ये आली होती. शेफाली नेमकी किती शिकली होती? तिचं शिक्षण कुठे झालं? याचाच घेतलेला हा आढावा.
शेफाली जरीवाला फक्त ग्लॅमर्सच्या दुनियेतच नव्हे तर शिक्षणातही खूप पुढे होती. तिने टेक्निकल शिक्षण घेतलं होतं हे अनेकांना माहीत नाही. शेफालीने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीतून मास्टर्सची डिग्री घेतली होती. शेफाली अत्यंत टॅलेंटेड होती. ती अभ्यासात नेहमी पुढे असायची.
शाळा कोणती?
दार्जिलिंगच्या कालिम्पोंग येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून तिने शालेय शिक्षण घेतलं होतं. शिक्षण आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये संतुलन ठेवणं प्रत्येकाला जमत नाही. पण शेफालीने ते करून दाखवलं होतं. ती अत्यंत मेहनती होती.
शेफाली मूळची कुठली?
शेफालीचा जन्म 24 नोव्हेंबर 1982चा. तिचा जन्म अहमदाबादला झाला होता. तिने 2005मध्ये मास्टर्सची डिग्री घेतली. त्याच दरम्यान तिला कांटा लगा गाण्याच्या अल्बममध्ये काम करण्याची संदी मिळाली. या एका गाण्याने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ती रातोरात फेमस झाली.
कसं होतं करिअर?
कांटा लगा गाण्यामुळे शेफाली फेमस झाली. पण तिला तिच्या करिअरमध्ये बरेच चढ उतार पाहायला मिळाले. तिने अनेक गाण्याचे अल्बम, सिनेमे आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं. पण कांटा लगा गाण्याएवढी लोकप्रियता तिला मिळाली नहाी. तिचे सिनेमेही चालले नाहीत. मधल्या काळात ती बिग बॉसमध्येही आली होती.
