AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill: सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातील शहनाजचा लूक आला समोर, पहा Viral Video

'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील शहनाजचा लूक पहायला मिळतोय. अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Shehnaaz Gill: सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातील शहनाजचा लूक आला समोर, पहा Viral Video
Shehnaaz Gill and Salman KhanImage Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 3:28 PM
Share

पंजाबी गायिका, अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिलने (Shehnaaz Gill) अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून शहनाजच्या बॉलिवूड पदार्पणाच्या जोरदार चर्चा आहेत. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) तिला लाँच करतोय. ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या बहुचर्चित चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र यावर सलमान किंवा शहनाजने कोणतीच अधिकृत माहिती दिली नव्हती. आता ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील शहनाजचा लूक पहायला मिळतोय. अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये शहनाज व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना दिसतेय. शहनाजच्या दाक्षिणात्य लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हाफ साडी, मोठी वेणी आणि त्याला माळलेला गजरा असा तिचा लूक आहे. हा व्हिडीओ क्लिअर नसला तरी नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पहा व्हिडीओ-

सलमान आणि शहनाजसोबत यामध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि पूजा हेगडेसुद्धा भूमिका साकारणार आहेत. अलीकडेच शहनाज बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत दिसली होती. या पार्टीदरम्यान तिचा शाहरुख खानला भेटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इफ्तार पार्टीला सलमान खानसुद्धा हजर होता. नंतर शहनाजने सलमानचीही भेट घेतली. सलमानची बहीण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीलाही शहनाज हजर होती. यावेळीही तिचा आणि सलमानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत काम करतेय पण तिला खरी ओळख बिग बॉस 13 मुळे मिळाली. शहनाज आणि सिद्धार्थची मैत्री इतकी गाजली की चाहत्यांना या दोघांना ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.