राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची सोशल मीडिया पोस्ट, चाहत्यांमध्ये सुरुये जोरदार चर्चा!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी न्यायालयातून जामीन मिळाला. मुंबईच्या एका न्यायालयाने व्यावसायिकाला 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे.

राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची सोशल मीडिया पोस्ट, चाहत्यांमध्ये सुरुये जोरदार चर्चा!
Shilpa-Raj

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी न्यायालयातून जामीन मिळाला. मुंबईच्या एका न्यायालयाने व्यावसायिकाला 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे. राज याला 2 महिन्यांनी जामीन मिळाला. आता राजला जामीन मिळाल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मेसेज शेअर केला आहे.

या मेसेजमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, त्या पाहून येथे असा अंदाज बांधला जात आहे की, राज यांना जामीन मिळाल्यानंतरच तिने ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये इंद्रधनुष्य दिसत आहे आणि त्याच्यासोबत लिहिले आहे, ‘इंद्रधनुष्य हे सिद्ध करण्यासाठी आहेत की, सुंदर गोष्टी वाईट वादळानंतरही घडतात.’ हा कोट रॉजर ली यांनी लिहिला आहे.

पाहा शिल्पाची पोस्ट

Post

Post

अलीकडेच शिल्पा माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आली होती. या दरम्यान, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.

राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. राज याच्यासह या प्रकरणात आणखी 11 जणांना अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या याचिकेवर अनेक वेळा सुनावणी झाली आणि प्रत्येक वेळी त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली, पण आता राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.

राजला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट

राजच्या अटकेनंतर शिल्पाने या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने लिहिले होते की, मी आजपर्यंत काहीही चुकीचे केले नाही आणि मी पुढेही तसे काही करणार नाही. तर कृपया माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवू नका. एक सेलिब्रिटी म्हणून मी ना तक्रार केली आहे, ना पुढे करणार आहे. माझा मुंबई पोलिसांवर आणि भारताच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.

राजला अटक केल्यानंतर शिल्पाने काही दिवस कामातून ब्रेक घेतला होता. आता ती गीता कपूर आणि अनुराग बसू सोबत ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या शूटिंगवर परत आली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच ‘हंगामा 2’ चित्रपटात दिसली होती, जो राजला अटक केल्यानंतर काही दिवसांनी प्रदर्शित झाला होता. शिल्पा या चित्रपटाबद्दल खूप उत्साहित होती, कारण या चित्रपटाद्वारे ती बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये परतत होती. पण राजच्या अटकेने तिचा सगळा उत्साह मावळला.

मात्र, अभिनेत्रीने चाहत्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली होती आणि असे म्हटले होते की चित्रपट बनवण्यासाठी बर्‍याच लोकांची मेहनत लागते, तर निश्चितपणे हा चित्रपट पहा.

आगामी चित्रपट

आता शिल्पा आगामी चित्रपट ‘निकम्मा’ मध्ये दिसणार आहे, ज्यात ती अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेतिया यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

Ek Thi Begum : पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम, ‘एक थी बेगम 2’ एमएक्स प्लेअरवर

Happy Birthday Rimi Sen | अभिनय विश्वापासून दूर जात राजकारणात उतरली होती रिमी सेन, पाहा कसा होता अभिनेत्री चित्रपट प्रवास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI