Emergency: कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’मध्ये श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयींची भूमिका

या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे जयप्रकाश नारायणन यांची भूमिका साकारणार आहेत.

Emergency: कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयींची भूमिका
श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयींची भूमिका
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 27, 2022 | 11:28 AM

कंगना रनौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटातील एकेका भूमिकेवरून पडदा उचलण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे जयप्रकाश नारायणन यांची भूमिका साकारणार आहेत. वाजपेयींच्या लूकमधील पोस्टर शेअर करत तळपदेनं ट्विट केलं, “सर्वात प्रिय, दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनतेचा माणूस.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याचा सन्मान आणि आनंद मला मिळाला आहे. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन. गणपती बाप्पा मोरया.” ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती कंगनाच करत आहे.

श्रेयसच्या भूमिकेबद्दल कंगना एका मुलाखतीत म्हणाली, “श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे तरुण आणि आघाडीचे नेते होते. ते आणीबाणीच्या नायकांपैकी एक होते. श्रेयस हा एक अष्टपैलू अभिनेता असल्यामुळे त्याला चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी करून घेणं हे आमचं भाग्य आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील त्याचा अभिनय अविस्मरणीय ठरेल असा मला विश्वास आहे.”

पहा पोस्टर-

याआधी चित्रपटातील कंगनाचा इंदिरा गांधी यांच्या लूकमधील पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये कंगना हुबेहूब इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसत असून तिच्या लूकचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. आणीबाणीला भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय मानलं जातं. हाच अध्याय कंगना तिच्या या चित्रपटातून उलगडणार आहे. कंगना रनौत ते इंदिरा गांधी असा लूकमधील ट्रान्सफॉर्मेशन ऑस्कर-विजेता डेव्हिड मालिनॉस्की यांनी केला आहे. डेव्डिड यांनी डार्केस्ट अव्हर (2017), वर्ल्ड वॉर झेड (2013) आणि द बॅटमॅन (2022) यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें