Sonu Sood Net Worth | ज्या सोनू सुदच्या घरी आयकरची टीम पोहोचलीय, तो वर्षाला किती कमावतो माहितीय का?

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता.

Sonu Sood Net Worth | ज्या सोनू सुदच्या घरी आयकरची टीम पोहोचलीय, तो वर्षाला किती कमावतो माहितीय का?
सोनू सूद
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 6:21 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अक्षरशः राज्य करत आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू प्रत्येकासाठी ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता. पण, आता अशी बातमी येत आहे की आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी एक सर्वेक्षण केले आहे.

सोनू हा एक असा कलाकार आहे, ज्याने स्व: मेहनतीने अभिनया विश्वात नाव कमावले आहे. अभिनेत्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. लॉकडाऊन दरम्यान गरजवंतांना आवश्यक ती सगळी मदत करणाऱ्या सोनूकडे नेमकी किती संपत्ती (Net Worth) आहे? चला तर जाणून घेऊया…

सोनूची कौटुंबिक पार्श्वभूमी

सोनू सूदने मोगा येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याची आई प्राध्यापक होती आणि वडील कापड व्यापारी होते. शालेय शिक्षणानंतर, त्याला यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करण्यासाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. या दरम्यान मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. मनोरंजन विश्वात टिकाव न लागल्यास वडिलांचा कापड व्यवसाय बॅकअप म्हणून होताच.

सोनूची संपत्ती किती?

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.

सोनू आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996मध्ये लग्न केले.

घर, हॉटेल आणि कॅफेचा मालक!

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.

गाड्यांचीही आवड

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

लॉकडाऊन काळात दिला मदतीचा हात!

अभिनेता सोनू सूदने या कठीण काळात मदतीचा हात पुढे करत भारतीयांच्या हृदयात ज्याप्रकारे स्थान निर्माण केले आहे, ते विशेष आहे. लोकांना मदत करण्यात अभिनेता नेहमीच पुढे असतो. गेल्या वर्षापासून तो दररोज हजारो लोकांना मदत करत आहे. त्याने लोकांना घरं, पैसा, औषध आणि नोकर्‍या देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याच्या घरी आजकाल लोकांची गर्दी दिसत आहे. सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.

हेही वाचा :

कियारा अडवाणीचा ‘टाय-डाय’ लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर!

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची पाहणी, अभिनेत्याच्या मुंबईस्थित कार्यालयातही पोहचली टीम!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.