Sonu Sood | अभिनेता सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची पाहणी, अभिनेत्याच्या मुंबईस्थित कार्यालयातही पोहचली टीम!

अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) मुंबईतील कार्यालयाचे आयकर विभागाकडून "सर्वेक्षण" करण्यात येत आहे, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर काही दिवसांनीच हा सर्व्हे करण्यात येत आहे.

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची पाहणी, अभिनेत्याच्या मुंबईस्थित कार्यालयातही पोहचली टीम!
Sonu Sood

मुंबई : अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) मुंबईतील कार्यालयाचे आयकर विभागाकडून “सर्वेक्षण” करण्यात येत आहे, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर काही दिवसांनीच हा सर्व्हे करण्यात येत आहे. आयकर विभाग सकाळपासून सूदच्या कार्यालयात पाहणी करत आहे. वास्तविक, या सर्वेक्षणाद्वारे, आयकर विभाग बॉलिवूड अभिनेत्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.

अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत. आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत.

यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत प्रचाराबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. केजरीवाल पुढं म्हणाले की, दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

शिक्षण हा एक मोठा प्रश्न आहे!

यानंतर सोनू सूद म्हणाला की, लॉकडाऊननंतर जेव्हा आम्ही अनेक लोकांशी संपर्क साधला, तेव्हा कळलं की शिक्षण ही एक मोठी समस्या आहे. पण या दरम्यान मोठे प्रश्न असे आहेत की मुलांना पुढं काय करावं हे माहित नाही. कुटुंबात सांगायला कोणी नाही. तुम्ही मुलांना शिक्षण द्याल, पण त्यांना योग्य दिशा देणारा कोणीतरी असावा. तर या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असेल.

लोकांनी मार्गदर्शक होण्यासाठी पुढे यावं : सोनू सूद

अभिनेता पुढे म्हणाला की, जास्तीत जास्त लोकांनी यात सामील व्हावं. मुलांचे मार्गदर्शक होण्यासाठी पुढे या. देशासाठी काहीतरी करण्यासाठी दिल्ली सरकारनं आज हे व्यासपीठ तयार केलं आहे. आता तुम्ही पुढे या आणि या मुलांना मदत करा, यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता आणि देशाचं चांगलं भविष्य तयार करू शकता.

मी याबद्दल विचार केला नाही!

पक्षात सामील होण्यावर आणि निवडणूक लढवण्यावर सोनू सूद म्हणाला की, लोक नेहमी म्हणतात की तुम्ही चांगले काम करत आहात, राजकारणात या. मात्र कोणत्याही चांगल्या कामासाठी ते आवश्यक नसतं. मला ऑफर येतात, पण मी याबद्दल कधीच विचार केला नाही. मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणाबद्दल बोललो नाही. पंजाबमध्ये प्रचाराबाबत सोनू म्हणाला की त्यानं याबद्दल काहीही विचार केला नाही.

हेही वाचा :

Video | ‘देवदास’ची ‘पारो’ बनून अंकिता लोखंडेचा डान्स, ‘पवित्र रिश्ता 2’च्या शूटिंग दरम्यान दिसला अभिनेत्रीचा नवा अवतार!

‘हृतिक रोशन के घर सीलन?’, घरातील ओल पकडलेल्या भिंतीला पाहून चाहतीचा प्रश्न, उत्तर देताना हृतिक म्हणतो…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI