AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला…

कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती.

Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला...
| Updated on: Feb 22, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. अशावेळी सोनू सूद (Sonu Sood)  लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता. आणि आजही तो प्रत्येकाची मदत करतो आहे. (Sonu Sood shared a video of herself making ‘Tandoori Roti’)

नुकताच सोनूने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये सोनू तंदूरी रोटी बनवताना दिसत आहे. रोटी तयार केल्यानंतर सोनू म्हणाला की, सोनू सूद सर्वात चांगली तंदूरी रोटी तयार करतो मग एकदा सोनू सूदच्या ढाबाला भेट द्या…हा व्हिडीओ शेअर करताना सोनूने लिहिले आहे की, सोनू दा ढाबा…

काही दिवसांपूर्वी बासू गुप्ता नावाच्या एका तरूणाने सोनू सूदला ट्विट करून म्हटंले होते की, ‘सोनू सूद सर, आमच्या गावात लंगूर माकडाने डझनभर लोकांना जखमी केले आहे आणि गावामध्ये त्या माकडाची दहशत निर्माण झाली आहे तरी तुम्ही काहीही करून आमच्या गावापासून दूर जंगलात त्या माकडाला पाठवा, माझी विनंती आहे.

ट्विटरवर उत्तर देताना सोनू सूदने लिहिले होते की, आता हे माकड पकडायचे काम राहिले होते, आता ते पण करून पाहतो मित्रा… पत्ता पाठवा…सोनू सूदच्या या भन्नाट उत्तरानंतर एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे खरोखरच आता सोनू सूद माकड पकडण्यासाठी जाणार का? आणि सोनू सूदने जे बोलले ते खरं करून दाखवलं होत. सोनूने त्या गावातील ते माकड पकडून दाखवल्याचे एक ट्विट करून सोनू सूदने व्हिडीओ शेअर करत लिहिलं होते की, बघा आता माकडही पकडलं आहे, बोला…

संबंधित बातम्या : 

सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो!

Video : अभिनेत्री मोनालिसाचे ‘दीदार दे’ गाण्यावर ठुमके, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!

(Sonu Sood shared a video of herself making ‘Tandoori Roti’)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...