AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | सुहाना हिने उडवली शाहरुख खान याची खिल्ली, अभिनेत्याने केले मोठे विधान

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय आणि तेंव्हापासूनच शाहरुख खान हा चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Shah Rukh Khan | सुहाना हिने उडवली शाहरुख खान याची खिल्ली, अभिनेत्याने केले मोठे विधान
| Updated on: Apr 01, 2023 | 9:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय. पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूड चित्रपटांमध्ये चार वर्षांनी पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते.

शेवटी तो दिवस आला आणि शाहरुख खान याने 25 जानेवारी रोजी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. विशेष म्हणजे ओपनिंग डेलाच पठाण चित्रपटाने जगभरातून तब्बल 100 कोटींची कमाई केली. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याने डंकी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी लकी ठरले आहे.

डंकी चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याने जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीच जवान चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर लिक झाले होते. एका जुन्या मुलाखतीमध्ये शाहरुख खान याने अत्यंत मोठा खुलासा करत मुलगी सुहाना खान कशाप्रकारे आपली खिल्ली उडवते हे सांगताना शाहरुख खान हा दिसला.

शाहरुख खान म्हणाला की, मला ट्विटरवाल्यांनी एक हुडी दिली. मात्र, ती मोठी आहे. मी ज्यावेळी ती हुडी घालून बाहेर जातो, त्यावेळी माझी मुलगी हसते आणि माझी खिल्ली उडवते. मी ती हुडी घालून तिच्यासोबत सात वेळा बाहेर गेलो आहे आणि तिला म्हटले की, आता यामध्ये मला कोणीही ओळखणार नाही. मात्र, सातही वेळा गाडीतून बाहेर पडल्या पडल्या लोकांनी मला ओळले. मुलगी म्हणाली पप्पा तुमच्या चलण्यावरून लोक तुम्हाला ओळखतात आणि तिथून मला पळून जावे लागते.

शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही यंदाच द आर्चीज चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. फक्त सुहाना खान हिच नाहीतर द आर्चीज चित्रपटातून बोनी कपूर याची लेक आणि जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...