Sumona Chakravarti: सुमोना चक्रवर्ती होणार मुखर्जी कुटुंबाची सून? राणी मुखर्जी, काजोलच्या चुलत भावाशी करणार लग्न

Sumona Chakravarti: सुमोना चक्रवर्ती होणार मुखर्जी कुटुंबाची सून? राणी मुखर्जी, काजोलच्या चुलत भावाशी करणार लग्न
Sumona Chakravarti
Image Credit source: Instagram

सम्राट (Samrat Mukerji) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी, तनिषा आणि अयान मुखर्जी यांचा चुलत भाऊ आहे. सम्राट आणि सुमोनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 25, 2022 | 9:43 AM

‘द कपिल शर्मा शो’मधील (The Kapil Sharma Show) सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत (Samrat Mukerji) ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सम्राट हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी, तनिषा आणि अयान मुखर्जी यांचा चुलत भाऊ आहे. सम्राट आणि सुमोनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर अखेर सुमोनाने मौन सोडलंय. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘ई टाइम्स’शी बोलताना ती म्हणाली, “अरे देवा, सोशल मीडियावरील ही जवळपास दहा वर्षांपूर्वींची स्टोरी आहे. हा सर्व मूर्खपणा आहे. खरं सांगायचं झालं तर मला या विषयावर किंवा माझ्या खासगी आयुष्याबाबत काहीच बोलायचं नाहीये. माझ्या लग्नाबाबत खरंच काही बातमी असेल तर मी तुम्हाला सांगेन. मी स्वत: ते जाहीर करेन. सम्राट हा माझा खूप चांगला मित्र आहे.”

सम्राटने 1996 मध्ये ‘राम और श्याम’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर 1997 मध्ये त्याचा ‘भाई भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदीसोबतच त्याने काही बंगाली चित्रपटांमध्येही काम केलंय. 2005 मध्ये त्याने विशाल भारद्वाज यांच्या ‘द ब्लू अंब्रेला’मध्ये बिज्जूची भूमिका साकारली होती. तर 2010 मध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटात त्याने गणेश घोष यांची भूमिका साकारली.

सुमोनाने ‘मन’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बर्फी’, ‘किक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. ‘द कपिल शर्मा शो’मुळे तिला लोकप्रियता मिळाली. ‘बडे अच्छे लगते है’ या लोकप्रिय मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें