Sushant Singh Rajput Case | लग्नासाठी सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर, 2 जुलैला पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र आणि फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला अलीकडेच पोलिसांनी पुन्हा अटक केली होती. ज्यानंतर आता त्याला जामीन मिळाला आहे. सिद्धार्थ याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput Case | लग्नासाठी सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर, 2 जुलैला पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार!
सिद्धार्थ पिठाणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र आणि फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला अलीकडेच पोलिसांनी पुन्हा अटक केली होती. ज्यानंतर आता त्याला जामीन मिळाला आहे. सिद्धार्थ याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, 2 जुलै रोजी पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सिद्धार्थ पिठाणी याने लग्नासाठी हा जामीन कोर्टाकडून मागितला होता. जो आता कोर्टाने मान्य केला आहे (Sushant Singh Rajput Case flatmate Siddharth Pithani gets interim bail for wedding).

यासंदर्भात बोलताना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले की, सिद्धार्थ पिठाणी याला त्याच्या लग्नासाठी 10 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. त्याला 2 जुलैला परत आत्मसमर्पण करावे लागेल. 28 मे रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सिद्धार्थला हैदराबादहून परत अटक केली होती. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित ड्रग्स प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी याचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी अनेकदा त्याच्याकडे चौकशी केली आहे.

सिद्धार्थकडून ड्रग्जची पुरवणी

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) म्हटले आहे की, या प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी सुशांतसाठी ड्रग्स आणत असल्याचेही आढळले होते. त्यानंतर पोलिस आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने संयुक्त ऑपरेशन करून मुंबईतील अनेक मोठ्या मादक पदार्थांच्या तस्करांना पकडले. याशिवाय बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची नावेही या प्रकरणात समोर आली आहेत. अशा परिस्थितीत सुशांतच्या मृत्यूला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले आहे. जेथे 15 जून रोजी एम्सच्या वैद्यकीय मंडळाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. या अहवालात या अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्येने झाल्याची पुष्टी झाली आहे. तर, अभिनेत्याच्या मृत्यूची वेळ सकाळी 10.10 होती.

सुशांतच्या मृत्यूबद्दल एक गोष्ट निश्चित झाली आहे की अभिनेत्याने आत्महत्या केली होती, ज्यामुळे त्याने आपला जीव गमावला. आता या संपूर्ण प्रकरणात कोणती नवीन सत्ये समोर येतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

सुशांतच्या ड्रग्जविषयी दोघांना माहिती?

सिद्धार्थ पिठाणी याच्या चौकशीत नोकर नीरज आणि केशव यांचं नाव आलं होतं. नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे सुशांतकडे घरकाम करत होते. सुशांतला कोण कोण ड्रग्ज देत होतं, कोण ड्रग्ज मागवत होतं, याची सर्व माहिती पिठाणीप्रमाणेच केशव आणि नीरज यांना होती. एनसीबी अधिकाऱ्यांनी पिठाणीला अटक केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या नीरज आणि केशव यांच्याही अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. या दोघांचीही एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

(Sushant Singh Rajput Case flatmate Siddharth Pithani gets interim bail for wedding)

हेही वाचा :

Vidya Balan Net Worth | घर, गाड्या आणि पैसे, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे ‘शेरनी’ विद्या बालन!

Video | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ