AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लूप लपेटा’ चित्रपटातील तापसी पन्नूचा हटके लूक बघितला का?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटातून तापसीने स्वत: ला सिध्द केलं आहे.

'लूप लपेटा' चित्रपटातील तापसी पन्नूचा हटके लूक बघितला का?
| Updated on: Feb 02, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटातून तापसीने स्वत: ला सिध्द केलं आहे. तापसीचा आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’ (Looop Lapeta) यामधील तापसीचा पहिला लूक समोर आला आहे. तापसी पन्नू आता ‘लूप लपेटा’ या नव्या चित्रपटाने लोकांची मने जिंकण्यासाठी तयार झाली आहे. ‘लूप लपेटा’ च्या या फर्स्ट लूकमध्ये तापसी पन्नू अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. ती टॉयलेटच्या सीटवर बसली आहे. तापसीने फस्ट लूक तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Taapsee Pannu’s first look release from the movie Looop Lapeta)

‘लूप लपेटा ‘ हा विनोदी-थ्रिलर चित्रपट आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या जर्मन ‘रन लोला रन ‘ चित्रपटाचा हा हिंदी रीमेक चित्रपट आहे. या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन टॉम टेकर यांनी केले होते. त्याचबरोबर ‘लूप लपेटा’ हे दिग्दर्शन आकाश भाटिया करत आहेत.आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर एक खळबळ उडवून देणारं ट्वीट केले होते. “अभिनेता सुशांतसिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला होता.

रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश होता. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तपासीने आपले मत मांडले होते. “करेक्शन. ती सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल.

सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं होते. तापसीने ट्वीट केल्यानंतर काही काळ ती ट्विटरवर ट्रेंडमध्ये झाली होती. मात्र सुशांतच्या चाहत्यांना तिचे मत न रुचल्याने ते सोशल मीडियावरुन तिच्यावर तुटून पडले होते.

संबंधित बातम्या : 

Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी

(Taapsee Pannu’s first look release from the movie Looop Lapeta)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.