AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तनुश्री दत्ता हिच्या निशाण्यावर पुन्हा एकदा नाना पाटेकर, पोस्ट शेअर करत म्हटले की…

आता धुमधडाक्यात नाना पाटेकर पुनरागमन करणार असून प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमध्ये नाना महत्वाच्या भूमिकेत आहेत.

तनुश्री दत्ता हिच्या निशाण्यावर पुन्हा एकदा नाना पाटेकर, पोस्ट शेअर करत म्हटले की...
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 03, 2022 | 8:57 PM
Share

मुंबई : नाना पाटेकर चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नाना मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. 2020 मध्ये नाना पाटेकर शेवटी इट्स माय लाइफ या चित्रपटामध्ये शेवटचे दिसले होते. आता धुमधडाक्यात नाना पाटेकर पुनरागमन करणार असून प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमध्ये नाना महत्वाच्या भूमिकेत आहेत. याचदरम्यान आता अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिचा मोर्चा नाना पाटेकरकडे परत एकदा वळवला आहे. तिने नानाला अनेक गोष्टी सुनावल्या आहेत.

नाना पाटेकर विरोधात तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, चित्रपटसृष्टमध्ये असे काही पुरूष आहेत, जे तरुण आणि निष्पाप मुलींना त्रास देतात. इतकेच नाही तर त्यांचे करिअर खराब करून त्यांना आयुष्यामधून उठवण्याचा प्रयत्न करतात.

अशा गोष्टी खूप जास्त वाईट आहेत. मला आणि माझ्यासारख्या कितीतरी मुलींना याने त्रास दिलाय. नाना पाटेकर हा एक दुष्ट माणूस आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचे चित्रपट तयार आहेत. परंतू रिलीज होत नाहीयेत यासाठी त्याला संघर्ष करावा लागतोय.

त्याचे चित्रपट फ्लाॅप आणि खराब जात आहेत. यामुळे आता तो ओटीटीवर काम करत आहे. तुम्ही गँग करून एखाद्या महिलेला गप्प करू शकता. पण सर्वांच्याच आत्माला सत्य नेमके काय आहे, हे माहिती आहे. डूबत्या माणसाला कोणीच वाचू शकत नाही. जो त्याची साथ देतो तो देखील डूबतो असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मीटूचा विषय ज्यावेळी चर्चेत आला होता. त्यावेळी तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरवर मोठा आरोप करत म्हटले होते की, एका चित्रपटाच्या सेटवर माझ्यासोबत छेडछाड केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तनुश्री सातत्याने नाना पाटेकर विरोधात पोस्ट शेअर करत असते.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर