Ajay Devgn | अजय देवगणच्या चित्रपटाला मोठा दिलासा, वाचा संपूर्ण प्रकरण
अजयच्या चित्रपटाला आता सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. थँक गॉड या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जातंय.

मुंबई : अजय देवगणचा (Ajay Devgn) थँक गॉड हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादामध्ये अडकलाय. अजयच्या चित्रपटाला आता सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. थँक गॉड या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जातंय. थँक गॉड चित्रपटाच्या (Movie) प्रदर्शनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिलाय. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता पुढील सुनावणी ही नोव्हेंबर (November) महिन्यात होणार आहे.
थँक गॉड चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिल्याने निर्मात्यांच्या अडचणी नक्की कमी झाल्या आहेत. हा चित्रपट याच महिन्यात 25 तारखेला रिलीज होतोय. चित्रपट रिलीज होण्याचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत. याचिकाकर्ते वकील मोहनलाल शर्मा म्हणाले की, चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आला असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी. यामुळे कायस्थ समाज दुखावला आहेत.
अजय देवगणचा बहुचर्चित थँक गॉड हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठा वाद निर्माण झालाय. अजय देवगणसह या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट निर्मात्यांनी भगवान चित्रगुप्ताचे पात्र अत्यंत चुकीच्या पध्दतीने दाखवले असल्याचा आरोप कायस्थ समाजाने केला आहे. हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचे कायस्थ समाजाचे म्हणणे आहे.
