KGF Chapter 2 | यशच्या वाढदिवसाचं खास निमित्त, ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा (Yash) आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ब्लॉकबस्टर फिल्म फ्रँचायझी 'KGF' च्या दुसऱ्या भागाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये यश त्याच धमाकेदार स्टाईलमध्ये दिसत आहे.

KGF Chapter 2 | यशच्या वाढदिवसाचं खास निमित्त, ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
KGF

मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा (Yash) आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ब्लॉकबस्टर फिल्म फ्रँचायझी ‘KGF’ च्या दुसऱ्या भागाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये यश त्याच धमाकेदार स्टाईलमध्ये दिसत आहे. यशची लोकप्रियता त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये सामील झाल्यावरून दिसून येत आहे. यशचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करू लागले आहेत. त्याचे चाहते त्याला सतत शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तो आधी जाहीर केलेल्या तारखेलाच प्रदर्शित होणार आहे.

आज सकाळी ‘केजीएफ’च्या निर्मात्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त सुपरस्टार यशच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर अनावरण केले आहे. पोस्टरसोबतच त्याने यशला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पोस्टर शेअर करताना चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दमदार कॅप्शन लिहिले आहे. ‘माझ्या लाडक्या रॉकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या राक्षसाची संपूर्ण जगाला ओळख करून देण्यासाठी मी आता थांबू शकत नाही’, असे लिहिले आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची निर्मिती करणाऱ्या फरहान खानच्या एक्सेल एंटरटेनमेंटनेही याच पोस्टरसह यशचे अभिनंदन केले आहे.

पाहा पोस्ट :

आज यशच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ट्विटर यशच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी भरले आहे. म्हणूनच #HBDRockingStarYash ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे. तर #KGFCchapter2 चौथ्या क्रमांकावर आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात या चित्रपटाबद्दल सगळीकडेच उत्सुकता आहे. यामुळेच यश आता संपूर्ण भारताचा सुपरस्टार बनला आहे. त्याने आपल्या स्वॅगने देशभरातील सिनेप्रेमींना वेड लावले आहे. यशचा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने केवळ दक्षिणेतच नव्हे तर हिंदी भाषिक भागातही जबरदस्त व्यवसाय केला.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदललेली नाही!

प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात असताना, ‘KGF: Chapter 2’ चे निर्माते आशा करत आहेत की, त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी कोरोना परिस्थिती सामान्य होईल. त्यामुळेच त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट अजूनही 14 एप्रिल 2022 ठेवली आहे. यश व्यतिरिक्त संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि रामचंद्र राजू देखील ‘KGF: Chapter 2’ मध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये तो रिलीज होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट याचे हिंदीत प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या एक वर्षापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू आहे, आता कोरोनाच्या परिस्थितीवर त्याचे प्रदर्शन अवलंबून आहे.

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Published On - 12:15 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI