AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal अडचणीत; इंदौरच्या रहिवाशानं केली पोलिसांत तक्रार, वाचा काय प्रकरण आहे…

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)विरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केलीय. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी इंदौरच्या एका रहिवाशानं ही तक्रार केलीय.

Vicky Kaushal अडचणीत; इंदौरच्या रहिवाशानं केली पोलिसांत तक्रार, वाचा काय प्रकरण आहे...
विकी कौशल
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 02, 2022 | 10:49 AM
Share

इंदौर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)विरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केलीय. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी इंदौरच्या एका रहिवाशानं ही तक्रार केलीय. विकी कौशल त्याच्या आगाची चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरला आहे. यावेळी अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan)सोबत तो बाइक चालवताना दिसला. नंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by #vickykaushal❤Vicky’s Hosay ❤ (@vickykaushalafghanfan)

‘हे बेकायदेशीर आहे’

तक्रारदार जयसिंग यादव यांनी दावा केलाय, की चित्रपटात वापरलेल्या बाइकचा क्रमांक त्याच्या वाहनाशी जुळतो. कोणीही व्यक्ती त्याच्या परवानगीशिवाय अशाप्रकारे नंबर प्लेट वापरू शकत नाही. तो म्हणतो, की चित्रपटात वापरण्यात आलेला वाहनक्रमांक माझा आहे. चित्रपट युनिटला याची माहिती आहे, की नाही हे मला माहीत नाही. मात्र हे बेकायदेशीर आहे. ते परवानगीशिवाय माझी नंबर प्लेट वापरू शकत नाहीत. मी याबाबत पोलिसांत निवेदन दिलंय. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे, असे वृत्तसंस्था एएनआयनं यादव यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. यादव यांनी त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटचा फोटोही एएनआयला शेअर केलाय.

‘चौकशी करणार’ पोलीस अधिकारी राजेंद्र सोनी यांनी सांगितलं, की मोटार वाहन कायद्यातल्या तरतुदींनुसार कारवाई करावी. अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. नंबर प्लेटचा गैरवापर झाला की नाही ते पाहू. चित्रपट युनिट इंदौरमध्ये असल्यास त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले.

बॉबी देओलसोबत दिसणार ‘आश्रम’मध्ये, सुपर हॉट ईशाने प्रियकरासोबतचे Liplock चे फोटो केले पोस्ट

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी

अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...