AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda: नवी मुंबईतील मॉलमध्ये घडलं असं काही.. विजय देवरकोंडा-अनन्या पांडेला कार्यक्रमातून घ्यावा लागला काढता पाय

महाराष्ट्रात आल्याने विजयनेही यावेळी मराठीतून संवादाला सुरुवात केली. त्याच्या तोंडून मराठी ऐकताच चाहत्यांनी एकच कल्ला केला. हळूहळू ही गर्दी स्टेजच्या जवळ जाऊ लागली.

Vijay Deverakonda: नवी मुंबईतील मॉलमध्ये घडलं असं काही.. विजय देवरकोंडा-अनन्या पांडेला कार्यक्रमातून घ्यावा लागला काढता पाय
विजय देवरकोंडा-अनन्या पांडेला कार्यक्रमातून घ्यावा लागला काढता पाय Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 1:40 PM
Share

विजय देवरकोंडा.. हे नाव आता फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत मर्यादित राहिलं नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेल्या विजयचा चाहतावर्ग हा किती मोठा आहे, याची प्रचिती नुकत्याच नवी मुंबईतील एका कार्यक्रमात आली. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्याकडून त्यांच्या आगामी लायगर (Liger) या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. कधी हे दोघं लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत, तर कधी नवी मुंबईतल्या मॉलमध्ये चाहत्यांच्या भेटीला जात आहेत. विजय आणि अनन्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मॉलमधल्या कार्यक्रमाची माहिती चाहत्यांना दिली होती. खुद्द सुपरस्टार चाहत्यांना भेटायला येणार असल्याने अनेकांनी मॉलमध्ये तुंबड गर्दी केली. ही गर्दी नंतर इतकी अनावर झाली की विजय आणि अनन्याला कार्यक्रमातून मध्येच तिथून निघावं लागलं.

विजयला पाहण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी पाहून आयोजकसुद्धा थक्क झाले होते. अनेकांनी हातात पोस्टर्स आणि स्केचेस घेऊन विजयसाठीचं आपलं प्रेम व्यक्त केलं. महाराष्ट्रात आल्याने विजयनेही यावेळी मराठीतून संवादाला सुरुवात केली. त्याच्या तोंडून मराठी ऐकताच चाहत्यांनी एकच कल्ला केला. हळूहळू ही गर्दी स्टेजच्या जवळ जाऊ लागली. ज्याठिकाणी विजय आणि अनन्या उभे होते, तिथल्या बॅरिकेट्सजवळ गर्दी पोहोचू लागली होती. गर्दीत एका महिलेला चक्करसुद्धा आली. अखेर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून विजय आणि अनन्या तिथून निघाले. कार्यक्रम पूर्ण होण्याआधीच दोघांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.

पहा व्हिडीओ-

विजय देवरकोंडा हा लायगर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच त्याची बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये चर्चा होत आहे. कॉफी विथ करण एपिसोडमध्ये जान्हवी कपूरने सांगितलं होतं की, तिला विजय देवराकोंडासोबत चित्रपट करायचा आहे. लायगर या चित्रपटात बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.