कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा

लता मंगेशकर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘गान कोकिळा’ म्हणूनही ओळखले जाते. लता मंगेशकर यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर आहे. सर्व वयोगटातील लोकांना लता मंगेशकर गाणी ऐकायला आवडतात. लता मंगेशकर यांनी मधुबालापासून काजोलपर्यंतच्या बहुतेक अभिनेत्रींच्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा
lata Mangeshkar

मुंबई : लता मंगेशकर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘गान कोकिळा’ म्हणूनही ओळखले जाते. लता मंगेशकर यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर आहे. सर्व वयोगटातील लोकांना लता मंगेशकर गाणी ऐकायला आवडतात. लता मंगेशकर यांनी मधुबालापासून काजोलपर्यंतच्या बहुतेक अभिनेत्रींच्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

आपण सगळेच लता मंगेशकर यांची गाणी ऐकतो. मात्र, एक व्यक्ती दररोज लता मंगेशकरांना फोन करायचा, ते सुद्धा फक्त एक खास गाणे ऐकण्यासाठी. तो व्यक्ती कोण होता आणि लता मंगेशकरांनी त्याच्यासाठी गाणे का गायच्या? चाल तर जाणून घेऊया …

हा किस्सा आहे 1956 मधला, जेव्हा ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर यांचा चोरी-चोरी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात एक अतिशय प्रसिद्ध गाणे होते, ‘रसिक बालमा दिल क्यों लागाय…’ हे गाणे नर्गिस यांच्यावर चित्रित झाले होते, तर लता मंगेशकरांनी आपल्या सुरेल आवाजाने हे गाणे सजवले. जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा त्याची लोकप्रियता खूप वाढली. या गाण्याने अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या हृदयाला स्पर्श केला.

हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या मेहबूब खान यांना झाली गाणे ऐकण्याची इच्छा

दुसरीकडे, ‘मदर इंडिया’ चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान यांनाही हे गाणे खूप आवडले. त्या दिवसांत ते आजारी होते आणि अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले मेहबूब खान यांना हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा आग्रह असायचा. हे गाणे रिलीज झाले तेव्हा ते भारतात होते, पण नंतर त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जावे लागले. त्यांनी लता मंगेशकरांच्या या गाण्याचे रेकॉर्ड कुठून तरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही.

मेहबूब खान यांना हे गाणे ऐकण्याचा खूप आग्रह वाटला. लता मंगेशकरांच्या आवाजात हे गाणे त्यांच्या कानावर पडावे, अशी त्यांची इच्छा होती. जेव्हा रेकॉर्डिंग मिळाली नाहीत, तेव्हा त्यांनी लॉस एंजेलिसहून मुंबईतील लता मंगेशकर यांच्या घरी फोन केला. जेव्हा लता मंगेशकरांनी फोन उचलला, तेव्हा मेहबूब खान तिथून म्हणाले की, ‘मी मेहबूब खान बोलत आहे, एक गाणे माझ्या आत्म्यात स्थिरावले आहे – ‘रसिक बलमा दिल क्यूं लगाया तोसे…’ मला हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. पण या गाण्याचे रेकॉर्ड इथे सापडत नाही. कृपया मला तुमच्या आवाजात हे गाणे ऐकवा.

लता मंगेशकरांनी ऐकवले गाणे…

मेहबूब खानच्या इच्छेचा आदर करत लता मंगेशकरांनी त्यांना लगेच होकार दिला. मग, लता मागेशकरांनी रसिक बालमा दिल लगा तोसे… त्यांच्या मधुर आवाजात मेहबूब खान यांना आंतरराष्ट्रीय कॉलवर ऐकवले.

त्या काळात इंटरनेट नव्हते, ज्यामुळे इतर देशांतील लोकांशी बोलणे आजच्यापेक्षा कठीण होते. इंटरनॅशनल कॉल्ससाठीही खूप पैसे लागायचे, पण मेहबूब खान, त्याची चिंता न करता, लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्यानंतर म्हणाले की, आता हृदय शांत झाले आहे. मी तुम्हाला एक विनंती करीत आहे की, जेव्हा जेव्हा मला असे वाटेल, तेव्हा मी तुमच्याकडून फोन करून हे ऐकू शकतो का?.

लता मंगेशकरांनी मेहबूब खान यांची ही विनंती आनंदाने स्वीकारली. लता मंगेशकरांनी मेहबूब खान यांना सांगितले की, मेहबूब साहेब, तुम्हाला जेव्हाही हवे असेल तेव्हा तुम्ही मला फोन करू शकता. रात्र असो की दिवस, तुम्ही मला सांगा, मी फोनवर येईन आणि हे गाणे तुम्ही जितक्या वेळा सांगाल तेवढे मी गाईन. यानंतर एकदा किंवा दोनदा नाही, तर 10 ते 20 वेळा मेहबूब खान यांनी लता मंगेशकरांना फोन करून हे गाणे ऐकले होते.

हेही वाचा :

Pooja Sawant : ‘मला ब्रिड आणि इंडीज मधील फरक कधीच समजला नाही’ म्हणत अभिनेत्री पूजा सावंतनं शेअर केले सुंदर फोटो

‘जेव्हा स्त्री एखादी गोष्ट करते, तेव्हा प्रश्न उपस्थित केलेच जातात…’, घटस्फोटानंतर समंथाने पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI