AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण

झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?, 'झुंड'वर टीकेचे बाण
नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 12:58 PM
Share

मुंबई : झुंड हा चित्रपट (Jhund movie) 4 मार्चला प्रदर्शित झाला आणि त्यानंतर या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांनी या सिनेमाच्या कथेचं, चित्रपटातल्या गाण्यांचं, अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या कामाचं कौतुक केलं. हिंदीतील टॉप दिग्दर्शकांनी या सिनेमाचं तोंड भरून कौतुक केलं.”भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे”, असं एका दिग्दर्शकाने म्हटलंय. इतकंच काय आमिर खानही (Amir Khan) या सिनेमाबद्दल भरभरून बोलला. नागराजच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलं. पण या सिनेमावर पहिल्यांदाच परखड टिका झाली आहे. “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, अश्या शब्दात झुंडवर टीका करण्यात आली आहे.

झुंडवर टीका

झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांची झुंड चित्रपटावर टीका केली आहे. “इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, अश्या शब्दात त्यांनी झुंडवर टीका केली आहे.

पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

शेफाली वैद्य यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याा पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. “चित्रपटात कुणाला घ्यायचं हा दिग्दर्शकाचा प्रश्न आहे त्यांना ते ठरवू द्या”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर त्याला उत्तर देताना शेफाली “कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुम्हाला हवं तितक्यांदा हा सिनेमा बघा…”, असं म्हणाल्या आहेत.

“किरण मानेंना सिनेमात घ्यायला हवं होतं” या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रकारच्या कमेंट पहायला मिळत आहेत. काहींनी तर “अभिनेते किरण माने यांनी सिनेमात घ्यायला हवं होतं. त्यांनी चांगलं काम केलं असतं”, असं म्हटलंय. तर त्याला शेफाली वैद्य यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Jhund: “तुला अशा रुपात पहायचं नव्हतं..”; आकाश ठोसरच्या भूमिकेवर पहा आमिर काय म्हणतोय?

अमिताभ नावाचं गारुड कित्येक वर्षापासूनच आहे; नागराज उगाच म्हणत नाही माझं स्वप्न होतं…

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.