AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2021 : ‘रांझा’पासून ते ‘नदियों पार’ पर्यंत, ‘या’ सुपरहिट गाण्यांनी 2021मध्ये घातला धुमाकूळ!

दरवर्षी अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येतात, जे रिलीज होताच सर्वत्र चर्चेत असतात. ही गाणी वर्षभर लोकांच्या प्लेलिस्टचा भाग राहतात. त्यातील काही पार्टी गाणी असतात आणि काही तुमचे मन रिफ्रेश करतात. 2021 हे वर्षही अशाच गाण्यांनी भरलेलं होतं, ज्यातील अनेक गाणी चाहत्यांनी लूपवर ऐकली आहेत.

Year Ender 2021 : 'रांझा'पासून ते 'नदियों पार' पर्यंत, ‘या’ सुपरहिट गाण्यांनी 2021मध्ये घातला धुमाकूळ!
Hit Songs
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 31, 2021 | 5:48 PM
Share

मुंबई : दरवर्षी अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येतात, जे रिलीज होताच सर्वत्र चर्चेत असतात. ही गाणी वर्षभर लोकांच्या प्लेलिस्टचा भाग राहतात. त्यातील काही पार्टी गाणी असतात आणि काही तुमचे मन रिफ्रेश करतात. 2021 हे वर्षही अशाच गाण्यांनी भरलेलं होतं, ज्यातील अनेक गाणी चाहत्यांनी लूपवर ऐकली आहेत.

‘शेरशाह’ चित्रपटातील ‘रांझा’ असो किंवा दिलजीत दोसांझचा GOAT अल्बम असो. या सर्व गाण्यांचा वर्षभर सर्वत्र बोलबाला होता. आज आम्ही तुम्हाला 2021 सालातील सुपरहिट गाण्यांबद्दल सांगत आहोत. जर ते तुमच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट नसतील, तर त्यांना आजच सामील करा…

रांझा

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. या चित्रपटातील रांझा हे गाणे सुपरहिट ठरले. जे आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहे.

बिजली

नुकताच हार्डी संधू आणि पलक तिवारी यांचा बिजली हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. हे गाणे रिलीज होताच सुपरहिट झाले आहे. या गाण्याला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.

बरबादियाँ

सनी कौशल आणि राधिका मदान यांचा ‘शिद्दत’ हा चित्रपट यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या प्रेमकथेला चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटातील पार्टी गाणे, बारबादियां प्रत्येक पार्टीत प्लेलिस्टमध्ये सामील झाले आहे. इतकेच नाही तर त्याच्या स्टेप्सही लोकांनी लक्षात ठेवल्या आहेत.

ना जा 2.0

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘ना जा 2.0’ हे गाणे हिट ठरले आहे. या गाण्यात कतरिना कैफच्या मुव्ह्स जबरदस्त आहेत.

राता लंबिया

शेरशाह चित्रपटाचे दुसरे गाणे ‘राता लंबिया’ देखील खूप पसंत केले गेले आहे. या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.

मेहरम

शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून गाणीही रिलीज होत आहेत. या चित्रपटातील ‘मेहरम’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून, त्याला खूप पसंत केले जात आहे.

नदियों पार

या वर्षाच्या सुरुवातीला जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जान्हवीचे एक आयटम साँग आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जबरदस्त मूव्ह दाखवताना दिसत आहे. हे गाणे प्रत्येक पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहे.

लूट गये

इमरान हाश्मी प्रत्येक वेळी त्याच्या चाहत्यांची मने जिंकतो. या वर्षी त्याचा ‘लूट गये’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. हे गाणे सुपरहिट ठरले. आजही हे गाणे सर्वांनाच आवडते. या गाण्याला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा :

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार; मंत्री जयंत पाटलांच्या हस्ते नाशिकमध्ये होणार सन्मान

Year Ender 2021 | ‘अन्नाथे’पासून ते ‘मास्टरपर्यंत, साऊथच्या ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कल्ला!

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?